शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ७४ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 11:27 PM

जिल्ह्यात दिवसागणिक रुग्णांसोबतच मृत्यूची संख्या वाढत आहे. सोमवारी ७४ नव्या रुग्णांची नोंद तर सलग दुसऱ्या दिवशी एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णांची संख्या २,३५७ तर मृतांची संख्या ३७ झाली आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्या २,३५७ : मृतांची संख्या ३७ : झिंगाबाई टाकळी, ताजबाग, जुनी मंगळवारीत रुग्णांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात दिवसागणिक रुग्णांसोबतच मृत्यूची संख्या वाढत आहे. सोमवारी ७४ नव्या रुग्णांची नोंद तर सलग दुसऱ्या दिवशी एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णांची संख्या २,३५७ तर मृतांची संख्या ३७ झाली आहे. विशेष म्हणजे, मौदा तालुक्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णाची नोंद झाली. कामठीमध्ये १८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरातील इतर वसाहतींसोबतच झिंगाबाई टाकळी, ताजबाग, जुनी मंगळवारी येथे रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. नागपुरात मागील आठवड्यात १० तर या दोन दिवसात तीन असे १३ दिवसात १३ मृत्यूची नोंद झाली. आज मृत्यू झालेला रुग्ण हा रामेश्वरी येथील रहिवासी होता. ५१ वर्षीय या रुग्णाला पहाटे मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसापासून ताप व श्वास घेण्यास त्रास होत होता. उच्चरक्तदाब व मधुमेहाचा आजारही होता. उपचार सुरू असताना रुग्णाचा मृत्यू झाला. मृत हा वनविभागात कार्यरत होता, अशी माहिती आहे. आज मेयोमधून १९, मेडिकलमधून चार, एम्समधून २४, नीरीमधून १७, खासगी लॅबमधून दोन, अ‍ॅण्टीजन चाचणीतून एक तर इतर प्रयोगशाळेतून सात असे ७४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या मेयोमध्ये १०३, मेडिकलमध्ये १२२, एम्समध्ये ४५, कामठी रुग्णालयात ३२, खासगी रुग्णालयात २४, आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये १८४ तर सेंट्रल जेल येथील कोविड केअर सेंटरमध्ये २१० रुग्ण उपचाराला आहेत. ४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५४५ झाली आहे.या वसाहतीत आढळले रुग्णझिंगाबाई टाकळी पाच, वायुसेनानगर एक, पिवळी नदी एक, विनोबा भावेनगर एक, सुभेदार ले-आऊट एक, कस्तूरचंद पार्क एक, चिटणवीसपुरा एक, आग्याराम देवी परिसर एक, रामेश्वरी एक, भगवाननगर एक, दिघोरी आठ, नाईक तलाव एक, वाठोडा एक, महाल झेंडा चौक एक, जुनी मंगळवारी पाच, बजेरिया एक, ताजबाग सात, इंदोरा एक, सेंट्रल जेल येथून एक, गणेश टेकडी एक, गोकुळपेठ शंकरनगर एक असे ४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले.कामठीत १८ रुग्णांची नोंद, मौद्यामध्ये कोरोनाचा शिरकावकामठी ताल्युक्यात १८ रुग्णांची नोंद झाली. या तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ६१ झाली. कामठी शहर ४९, येरखेडा येथे चार, भिलगाव येथे तीन, नांदा, कोराडी, महादुला, बिडगाव, रनाळा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. मौदा तालुक्यातही आता कोरोनाचा शिरकाव झाला. एनटीपीसी पॉवर हाऊस येथे काम करण्याकरिता उत्तर प्रदेश राज्यातील बलिया जिल्ह्यामधून आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.संशयित : २,६२०बाधित रुग्ण : २,३५७घरी सोडलेले : १५४५मृत्यू : ३७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू