शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा, चंद्रपूर व वाशिम जिल्ह्यात वाढला कोरोनाचा वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:06 IST

नागपूर : विदर्भात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा वेग वाढला होता. सध्या या विभागात रुग्णसंख्या ...

नागपूर : विदर्भात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा वेग वाढला होता. सध्या या विभागात रुग्णसंख्या स्थिर झाल्याचे दिसून येत असताना, आता नागपूर विभागात झपाट्याने रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. विशेषत: नागपूरनंतर भंडारा जिल्ह्यात रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे. चंद्रपूर व वाशिम जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. रविवारी ७,४५२ रुग्ण, ९१ मृत्यूची नोंद झाली. या वर्षातील मृत्यूचा हा उच्चांक आहे. यातील ५८ रुग्णांचे बळी एकट्या नागपुरातील आहेत. शिवाय, ३,९७० बाधित रुग्ण आढळून आले. बुलडाणा जिल्ह्यात ८३५ रुग्ण व ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. भंडारा जिल्ह्यात ४३९ रुग्ण व २ मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यात ४०० रुग्ण व ९ मृत्यू, अकोला जिल्ह्यात ३७६ रुग्ण व ३ मृत्यू, वाशिम जिल्ह्यात ३७७ रुग्ण व २ मृत्यू, अमरावती जिल्ह्यात ३४८ रुग्ण व ३ मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यात ३४१ रुग्ण व ३ मृत्यू तर वर्धा जिल्ह्यात ३०३ रुग्ण व ६ मृत्यूची नोंद झाली. गोंदियात रविवारी या वर्षांतील सर्वाधिक रुग्ण पॉझिटिव्ह आले.

जिल्हा : रुग्ण : ए. रुग्ण : मृत्यू

नागपूर : ३९७० : २,१८,८२० : ५८ :

गडचिरोली : ५६ : १०,४९० : ००

चंद्रपूर : ३४१ : २७,२६५ : ०३

गोंदिया : १०७ : १५,६३३ : ००

भंडारा : ४३९ : १६,७८९ : ०२

वर्धा : ३०३ : १,८१,२९२ : ०६

अमरावती : ३४८ : ४८,०२७ : ०३

यवतमाळ : ४०० : २७,५५१ : ०९

वाशिम : ३७७ : १५,२७३ : ०२

अकोला : ३७६ : २७,२०० : ०३

बुलडाणा : ७३५ : ३५,८७० : ०५