शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कोरोनाची तपासणी पडू शकते बंद!; ५०० वर नमुने प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:53 IST

मेयोतील यंत्र बंद पडताच कोरोना तपासणीची जबाबदारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) आपल्याकडे घेतली. परंतु राज्य सरकारने ‘टेस्टिंग किट’ उपलब्धच करून दिले नाही.

ठळक मुद्दे‘एम्स’वर दुसऱ्या राज्यातून टेस्टिंग किट मागण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेयोतील यंत्र बंद पडताच कोरोना तपासणीची जबाबदारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) आपल्याकडे घेतली. परंतु राज्य सरकारने ‘टेस्टिंग किट’ उपलब्धच करून दिले नाही. सुत्रानूसार, ‘एम्स’कडे सध्या ६०वर नमुने तपासणीपुरतेच किट उपलब्ध आहेत. यामुळे छत्तीसगड सरकारकडून त्यांनी किटची मागणी केली. किटचा तुटवडा असाच राहिल्यास तपासणी बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, दिल्ली व मरकजहून आलेल्यांसह इतरही संशयितांचे ५००वर नमुने मेयोमध्ये प्रलंबित पडले आहेत. कोरोना विषाणूची लागण झालेले किंवा संशयितांच्या घशातील द्रव पदार्थाच्या नमुन्याची तपासणी ‘टेस्टिंग किट’च्या मदतीन केली जाते. ही किट ‘पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन’ (पीसीआर) पद्धतीची असते. नागपुरात ही तपसणी मेयोच्या प्रयोगशाळेत सुरू आहे. वाढते नमुने लक्षात घेऊन नुकतेच मेयो प्रशासनाने शासनाकडून ६००वर किट मागवून घेतल्या. परंतु दोन दिवसांपूर्वी प्रयोगशाळेतील एक यंत्र बंद पडले. दुसºया यंत्रावर २०वर नमुने तपासता येत नाही. यातच मागितलेल्या या किट नव्या यंत्रासाठी असल्याने ही प्रयोगशाळाही अडचणीत आली आहे. रविवारी मेयोतील बंद यंत्राची चाचणी घेणे सुरू झाले असलेतरी यंत्र कधी सुरू होईल, याचेही उत्तर कुणाकडेच नाही. सध्या ‘एम्स’मध्ये कोरोना तपासणी सुरू झाली आहे. एका टप्प्यात ९०वर नमुने तपासण्याची यंत्राची क्षमता आहे. परंतु ‘किट’चा तुटवडा असल्याने तेही अडचणी आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘एम्स’ने राज्य शासनाकडे ‘किट’ची मागणी केली. परंतु त्यांना तुर्तास मिळाल्या नाहीत. त्यांनी छत्तीसगड शासनाकडे किटची मागणी केली असता त्यांनी दोन बॉक्स देण्यास परवानगी दिली. एका बॉक्समधून जास्तीत जास्त ३३ वर तपासण्या होतात. यामुळे ‘एम्स’ने तातडीने रविवारी छत्तीसगडसाठी एक वाहन रवाना केल्याची माहिती आहे. ‘एम्स’च्या संचालक डॉ. विभा दत्ता यांना याबाबत विचारले असता त्यांनी याला दुजोरा दिला.-प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढलीदिल्ली व मरकजहून आलेल्या व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे मोठ्या संख्येत नमुने मेयोत आले आहेत. एकट्या गोंदिया जिल्ह्यातून ७५ वर नमुने आले आहेत. सध्याच्या स्थितीत ५००वर नमुने प्रलंबित असल्यचे स्वत: मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी सांगितले.

-टेस्टिंग किटची समस्या राहणार नाहीपूर्वी मागणीनुसार टेस्टिंग किट मागविल्या जायच्या. परंतु आता मेयो सोबतच ‘एम्स’मध्येही नमुन्यांची तपासणी होऊ लागली आहे. यामुळे पुरेशा प्रमाणात किट मागितल्या आहेत. लवकरच त्या प्रयोगशाळांना उपलब्ध करून दिल्या जातील.

-डॉ. संजीव कुमार विभागीय आयुक्त

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस