शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वाढला, एसटीचे प्रवासी घटले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:12 IST

नागपूर : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसवर विपरीत परिणाम पडला आहे. कोरोनाच्या पूर्वी नागपूर विभागात ४४५ बसेस ...

नागपूर : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसवर विपरीत परिणाम पडला आहे. कोरोनाच्या पूर्वी नागपूर विभागात ४४५ बसेस चालविण्यात येत होत्या. कोरोनाच्या काळात १५० बसेस चालविण्यात आल्या. अनलॉकच्या प्रक्रियेनंतर ४०० बसेसद्वारे प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती. परंतु आता कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढल्यामुळे एसटीच्या प्रवाशांची संख्या घटली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या पूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये दररोज सरासरी १ लाख ८० हजार प्रवाशांनी प्रवास केला. कोरोना सुरु असताना केवळ १२ हजार ३०० प्रवाशांनी एसटी बसने प्रवास केला. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर बसेसची संख्या वाढविण्यात आल्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये विभागात दररोज सरासरी १ लाख प्रवाशांनी प्रवास केला. नागपूर विभागाने पुणे मार्गावर शिवशाही बसेसची संख्या वाढवून २ वरून ६ केली. परंतु आता पुन्हा कोरोनाची लाट आल्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे.

आकडेवारी

कोरोनापूर्वी चालविण्यात येणाऱ्या बसेस : ४४५

कोरोना सुरू असताना चालविलेल्या बसेस : १५०

सध्या सुरु असलेल्या बसेस : ४००

बसेसमध्ये निम्मे प्रवासीच

एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे पुणे आणि औरंगाबादला जाणाऱ्या बसेस अमरावती शहरात प्रवेश करण्याऐवजी बायपासने जात आहेत. एवढेच नव्हे तर अमरावतीच्या बसेसमध्ये केवळ ५० टक्के प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे शाळा, महाविद्यालय बंद झाले आणि एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. महामंडळाने आपल्या ३० शालेय बस बंद केल्या आहेत.

मास्क नाही, शारीरिक अंतरही नाही

नागपूरसह विदर्भात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे. एसटी महामंडळाच्या वतीनेही प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. परंतु प्रवाशांवर त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. सोमवारी एसटी महामंडळाच्या गणेशपेठ बसस्थानकावर अनेक प्रवासी विनामास्क फिरत असल्याचे दिसले. फिजिकल डिस्टन्सिंगचेही येथे पालन होत नसल्याचे चित्र होते.

............