शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्र निर्माण कार्यात योगदान द्या!

By admin | Updated: March 2, 2015 02:34 IST

सरकारकडून विविध योजनांवर अनुदान दिले जाते. परंतु सक्षम असलेल्या लोकांनी घरगुती वापराच्या गॅसवरील अनुदान परत करू ..

नागपूर : सरकारकडून विविध योजनांवर अनुदान दिले जाते. परंतु सक्षम असलेल्या लोकांनी घरगुती वापराच्या गॅसवरील अनुदान परत करू न राष्ट्र निर्माण कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन खासदार अजय संचेती यांनी रविवारी केले. छात्र जागृतीतर्फे आयोजित ‘राष्ट्र निर्माण मे मेरा योगदान ’अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खा. कृपाल तुमाने, हिंदुस्तान पेट्रोलियमचे वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक अमितावा धार, इंडियन आॅयल कार्पोरेशनचे संजीव माथूर, भारत पेट्रोलियमचे अजय भगत व कार्यक्रमाचे संयोजक अ‍ॅड. निशांत गांधी आदी उपस्थित होते. राष्ट्र निर्माण मे मेरा योगदान ही एक चळवळ व्हावी, सुरुवातीला लहान स्वरूप असले तरी भविष्यात ती व्यापक चळवळ होईल. माझ्यापासून या अभियानाचा प्रारंभ करीत असल्याचे संचेती यांनी सांगितले.लोकांना गरज नसतानाही सरकारी अनुदान घेण्याची सवय झाली आहे. ज्यांना गरज आहे, त्यांनीच अनुदान घ्यावे. सक्षम असलेल्यांनी ते घेऊ नये. पाच लाखाहून अधिक आयकर रिटर्न भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ न देण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याची माहिती कृपाल तुमाने यांनी दिली. निशांत गांधी यांनी प्रास्ताविकातून राष्ट्र निर्माण मे मेरा योगदान अभियाची माहिती दिली. नागपूर शहरात १०.५० लाख गॅस ग्राहक आहेत. यातील जेमतेम १ हजार लोकांनी गॅसवरील अनुदान नाकारले आहे. सक्षम लोकांनी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जे नागरिक विना अनुदानावरी गॅस सिलेंडर घेण्यास सक्षम आहेत त्यांनी अनुदान नाकारून राष्ट्र निर्माण कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन असलेल्या पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मोहम्मद सलीम यांनी संचलन तर विश्वजीत भगत यांनी आभार मानले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे सचिव अतुल कोटेचा, राजन ढढ्ढा, अमित बागवे, गजेंद्र पांडे, पार्थ मुजूमदार, नितीन पुणेकर, मेहुल तारेकर, चेतानंद रामटेके यांच्यासह छात्र जागृतीचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)