भिवापुरचे कोविड सेंटर सुरूच ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST2021-06-24T04:07:37+5:302021-06-24T04:07:37+5:30

भिवापूर :- कोरोना रुग्णांची संख्या ओसरत असल्याचे सांगत तालुकास्थळावरील कोविड सेंटर बंद करण्याचा आदेश सामान्य नागरिकांच्या जीवावर उठणारा आहे. ...

Continue to Kovid Center, Bhivapur | भिवापुरचे कोविड सेंटर सुरूच ठेवा

भिवापुरचे कोविड सेंटर सुरूच ठेवा

भिवापूर :- कोरोना रुग्णांची संख्या ओसरत असल्याचे सांगत तालुकास्थळावरील कोविड सेंटर बंद करण्याचा आदेश सामान्य नागरिकांच्या जीवावर उठणारा आहे. भिवापूरचे कोविड सेंटर बंद करू नका, अशी मागणी करणारे निवेदन भाजपा युवा मोर्चाच्यावतीने तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना देण्यात आले आहे. पुढील सहा ते आठ आठवड्यात कोरोनाची संभावित तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यावर वेळीच मात करण्यासाठी पूर्व नियोजन महत्वाचे आहे. मात्र असे न करता, जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्ह्यातील १४ कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश दिले. शिवाय कंत्राटी मनुष्यबळ कमी करण्याचेही सांगितले. कोरोनाची तिसरी लाट कधी येईल याचा नेम नाही. त्यामुळे कोविड सेंटर सुरूच ठेवून कंत्राटी मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रोहित पारवे, विवेक ठाकरे, हिमांशू अग्रवाल, सचिन ठवकर, भूषण नागोशे, धनंजय चौधरी, रमेश नक्षिणे, जावेद कुरेशी, नीलिमा नागोशे, सीता दुर्गे, वंदना चौधरी, ओंकार पोटेकर, गजू खांदे, देवराव जगताप, अनिल निखारे आदींचा समावेश होता.

===Photopath===

230621\fb_img_1624365289991.jpg

===Caption===

तहसीलदार अनिरूध्द कांबळे यांना निवेदण देतांना भाजपचे शिष्टमंडळ

Web Title: Continue to Kovid Center, Bhivapur