शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प्राईड इन्फ्रा इस्टेटला ग्राहक आयोगाची चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:08 IST

नागपूर : ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या प्राईड इन्फ्रा इस्टेट ॲण्ड लॅण्ड डेव्हलपर्सला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जोरदार चपराक ...

नागपूर : ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या प्राईड इन्फ्रा इस्टेट ॲण्ड लॅण्ड डेव्हलपर्सला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जोरदार चपराक बसली. तक्रारकर्त्या ग्राहकाचे १ लाख ५८ हजार ४०० रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश आयोगाने प्राईड इन्फ्राला दिला. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीच्‍या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमही प्राईड इन्फ्रानेच द्यायची आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्राईड इन्फ्राला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे.

भास्कर पिल्लेवान असे पीडित ग्राहकाचे नाव आहे. त्यांची तक्रार आयोगाच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी निकाली काढली. तक्रारीतील माहितीनुसार, पिल्लेवान यांनी प्राईड इन्फ्राच्या मौजा म्‍हसेपठार, ता. उमरेड येथील ले-आऊटमधील एक भूखंड १ लाख ५८ हजार ४०० रुपयात खरेदी केला. यासंदर्भात १७ सप्टेंबर २००८ रोजी करार झाला. त्यानंतर पिल्लेवान यांनी प्राईड इन्फ्राला वेळोवेळी एकूण १ लाख ५८ हजार ४०० रुपये देऊन त्याच्या पावत्या घेतल्या. प्राईड इन्फ्राने १७ ऑगस्ट २०१० पर्यंत विक्रीपत्र करून देण्‍याचे मान्‍य केले होते. परंतु, प्राईड इन्फ्राने शब्द पाळला नाही. पिल्लेवान यांना भूखंडाचे विक्रीपत्र करून देण्यात आले नाही. तसेच, कायदेशीर ताबाही देण्यात आला नाही. प्राईड इन्फ्राने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पिल्लेवान यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली. दरम्यान, प्राईड इन्फ्राने आयोगाची नोटीस स्वीकारली नाही. परिणामी, तक्रारीवर एकतर्फी कार्यवाही करून हा निर्णय देण्यात आला.

ग्राहकांची फसवणूक करण्याचा उद्देश

प्राईड इन्फ्राने विक्री करारनाम्यात विक्रीपत्र नोंदणीचा खर्च आणि विकास खर्च हा प्‍लॉटधारकाने करावा, असे नमूद केले आहे. परंतु, विक्रीपत्र केव्‍हा करणार किंवा त्‍याने ले-आऊटमध्‍ये काय विकास कामे केली, याचा उल्‍लेख कुठेच नाही. प्राईड इन्फ्रा कंपनी ले-आऊटचा कागदोपत्री नकाशा दर्शवून व प्रलोभन दाखवून ग्राहकांकडून पैसे घेत होती. ग्राहकांची फसवणूक करणे कंपनीचा उद्देश होता. ही कृती अनुचित व्‍यापारामध्ये मोडते, असे परखड निरीक्षण आयोगाने निर्णयात नोंदवले.