श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST2020-12-31T04:09:58+5:302020-12-31T04:09:58+5:30

कामठी : शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात कवठा शिवारातून वाहणाऱ्या खैरी नाल्यावर वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. पाण्याचे महत्त्व ...

Construction of Vanrai Dam through labor | श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती

श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती

कामठी : शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात कवठा शिवारातून वाहणाऱ्या खैरी नाल्यावर वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. पाण्याचे महत्त्व व संवर्धन लक्षात घेता या बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आल्याचेही यावेळी शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.

या बंधाऱ्यामुळे वाहून जाणारे पावसाचे पाणी काही प्रमाणात अडण्यास मदत हाेईल. त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी हाेऊ शकताे. शिवाय, जमिनीत पाणी मुरणार असल्याने या भागातील भूगर्भातील पातळी वाढण्यास मदत हाेणार असल्याने विहिरींची पाणी पातळी उंचावेल. त्याही पाण्याचा सिचंनासाठी उपयाेग हाेईल. शिवाय, उन्हाळ्यात पाण्याचे फारसे दुर्भिक्ष्य जाणवणार नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. या बंधाऱ्याच्या निर्मितीसाठी मंडळ कृषी अधिकारी डी. एस. तितरमारे, कृषी सहायक प्रवीण देहकर, संजय फळकुटे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कुहिते, नीलेश डफरे, पोलीस पाटील उद्धव कुहिते यांच्यासह शेतकऱ्यांनी श्रमदान केले.

Web Title: Construction of Vanrai Dam through labor