नागपुरात मेट्रो प्लाझा व मेडिकल हब उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 01:21 AM2018-08-05T01:21:31+5:302018-08-05T01:23:29+5:30

मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आॅरेंज सिटी प्रकल्पाचे काम आता महापालिका स्वत: करणार आहे. यासाठी वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते सीआरपीएफपर्यंतची ३०.४९ हेक्टर जमीन सात विभागात २१ प्लॉटमध्ये विभाजित करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत १० लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मेडिकल हब व जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनजवळ मेट्रो प्लाझा उभारण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी शनिवारी समितीच्या बैठकीनंतर दिली.

Construction of Metro Plaza and Medical Hub in Nagpur | नागपुरात मेट्रो प्लाझा व मेडिकल हब उभारणार

नागपुरात मेट्रो प्लाझा व मेडिकल हब उभारणार

Next
ठळक मुद्देआॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प : सात भागात प्रकल्पाचे विभाजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आॅरेंज सिटी प्रकल्पाचे काम आता महापालिका स्वत: करणार आहे. यासाठी वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते सीआरपीएफपर्यंतची ३०.४९ हेक्टर जमीन सात विभागात २१ प्लॉटमध्ये विभाजित करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत १० लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मेडिकल हब व जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनजवळ मेट्रो प्लाझा उभारण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी शनिवारी समितीच्या बैठकीनंतर दिली.
आॅरेंज सिटी स्ट्रीट हा महापालिका व भाजपाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. माझ्या कार्यकाळात या प्रकल्पाला सुरुवात क रण्याचा मानस आहे. ट्रान्झेक्शन अ‍ॅडवायझरसाठी निविदा काढण्यात आली आहे. पहिल्यावेळी प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्यांदा मे. वेस्टिन ग्लोबल वर्क प्लेस सर्व्हिसेस प्रा. लि. अ‍ॅन्ड वेंकटेश्वरा हॅबीटेट एलएलपी कंपनीला कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी बंगळुरू, पुणे यासह अन्य शहरात चांगले काम केले आहे. आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु एकमेव हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांना २५ लाखांचे बिल देण्यात आले आहे. त्याशिवाय दुसरा कोणत्याही स्वरूपाचा खर्च करण्यात आलेला नाही. आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प एकाच वेळी राबविण्याचा विचार होता. यासाठी वर्षभरापूर्वी प्रस्ताव मंजुरीसाठी पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची आशा असल्याची माहिती कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी दिली.
प्रकल्पाचे काम सुरू व्हावे, यासाठी दर आठवड्याला बैठक होत आहे. मेडिकल हबच्या धर्तीवर आॅरेंज सिटी स्ट्रीटचा सर्वप्रथम विकास केला जाईल. काही डॉक्टरांनी येथे रुग्णालय सुरू करण्याला सहमती दर्शविली आहे. यातून मिळणाºया उत्पन्नातून प्रकल्पाचा पुढील खर्च करण्याचा विचार आहे.

अवैध रस्ते बंद करणार
आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पातून १४ रस्ते जातात. येथे अवैध रस्ते निर्माण करण्यात आलेले आहेत. परवानगी नसलेले रस्ते बंद करण्यात येतील. आराखड्यातील प्रस्तावित रस्तेच कायम राहतील, अशी माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.

गणेश विसर्जनासाठी ११२ कृत्रिम टँक
गणेश विसर्जनसाठी महापालिका यावर्षी ११२ कृ त्रिम टँक उभारणार आहेत. १२ फूट बाय ३० इंच आकाराचे ५३ कृत्रिम टँक व १५ फूट बाय ३६ इंच आकाराचे ५९ कृत्रिम टँक झोन स्तरावर उपलब्ध करण्यात येतील. तर तीन टँकची अतिरिक्त व्यवस्था विभागाकडून केली जाणार आहे. जुने टँक वापरण्याजोगे असल्यास त्याचा वापर केला जाईल. मागणीनुसार पुरवठा केला जाईल. जिल्हा नियोजन समितीकडे यासाठी ६० लाखांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच आमदार व खासदार निधीतून यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. याबाबतच्या निविदा काढण्याला व दर निश्चित करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.

Web Title: Construction of Metro Plaza and Medical Hub in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.