शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

एम्प्रेस मॉलचे बांधकाम अनधिकृत

By admin | Updated: November 5, 2015 03:20 IST

उपराजधानीतील सर्वसामान्य नागरिकांनी घराचे बांधकाम करताना नियमाचे थोडे उल्लंघन केले तरी महापालिका वा नासुप्रचा

पार्किंगच्या जागेत बांधली दुकाने : यथास्थिती कायम ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश योगेंद्र शंभरकर ल्ल नागपूरउपराजधानीतील सर्वसामान्य नागरिकांनी घराचे बांधकाम करताना नियमाचे थोडे उल्लंघन केले तरी महापालिका वा नासुप्रचा त्यावर बुलडोझर चालतो. परंतु शहरातील नामांकित एम्प्रेस मॉलच्या निर्मात्यांनी नगररचना विभागाची अनुमती न घेता हजारो चौरस फूट अनधिकृत बांधकाम केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने १९ आॅगस्ट २०१५ ला अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविल्यानंतर मॉलने अनधिकृत बांधकाम केल्याचे शहरातील नागरिकांच्या निदर्शनास आले होते. पथकाने मॉलच्या पहिल्या मजल्यावरील अनधिकृत बांधकाम तोडण्याला सुरुवात केली. परंतु ‘लोकमत’ने यासंदर्भात इत्थंभूत माहिती गोळा केली असता, मॉलच्या निर्मात्यांनी एकाच मजल्यावर नव्हे तर हजारो चौरस फूट अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. नाव मोठे पण लक्षण खोटे, यानुसार अशा कंपन्या नियमाचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे धक्कादायक सत्य यानिमित्ताने शहरातील नागरिकांना माहीत झाले आहे. मॉल व्यवस्थापनाने एम्प्रेस मिलच्या पाच भूखंडाची खरेदी केली आहे. तज्ज्ञांच्या मते, महापालिका क्षेत्रात ५ हजार चौरस मीटरहून अधिक बांधकाम करावयाचे झाल्यास झोन कार्यालयाऐवजी नगररचना विभागाकडून बांधकामाचा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा लागतो. परंतु व्यवस्थापनाने प्रत्येक भूखंडावर अनधिकृत बांधकाम के ले आहे. भूखंड क्रमांक ५ येथील एम्प्रेस मॉलच्या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पार्किंग दर्शवून बांधकामाला मंजुरी घेतली होती. परंतु या मजल्यावर ११,२५७ चौरस मीटर भागात व्यावसायिक संकुलाचे बांधकाम करून दुकान गाळे काढले आहेत. या भूखंडाच्या मागील बाजूच्या ले-आऊ टमध्ये रस्त्याच्या जागेवर १४३३.६० चौरस मीटर बांधकाम करण्यात आले आहे.महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने १९ आॅगस्ट २०१५ ला अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविल्यानंतर मॉलने अनधिकृत बांधकाम केल्याचे शहरातील नागरिकांच्या निदर्शनास आले होते. पथकाने मॉलच्या पहिल्या मजल्यावरील अनधिकृत बांधकाम तोडण्याला सुरुवात केली. परंतु ‘लोकमत’ने यासंदर्भात इत्थंभूत माहिती गोळा केली असता, मॉलच्या निर्मात्यांनी एकाच मजल्यावर नव्हे तर हजारो चौरस फूट अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. नाव मोठे पण लक्षण खोटे, यानुसार अशा कंपन्या नियमाचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे धक्कादायक सत्य यानिमित्ताने शहरातील नागरिकांना माहीत झाले आहे. मॉल व्यवस्थापनाने एम्प्रेस मिलच्या पाच भूखंडाची खरेदी केली आहे. तज्ज्ञांच्या मते, महापालिका क्षेत्रात ५ हजार चौरस मीटरहून अधिक बांधकाम करावयाचे झाल्यास झोन कार्यालयाऐवजी नगररचना विभागाकडून बांधकामाचा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा लागतो. परंतु व्यवस्थापनाने प्रत्येक भूखंडावर अनधिकृत बांधकाम के ले आहे. भूखंड क्रमांक ५ येथील एम्प्रेस मॉलच्या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पार्किंग दर्शवून बांधकामाला मंजुरी घेतली होती. परंतु या मजल्यावर ११,२५७ चौरस मीटर भागात व्यावसायिक संकुलाचे बांधकाम करून दुकान गाळे काढले आहेत. या भूखंडाच्या मागील बाजूच्या ले-आऊ टमध्ये रस्त्याच्या जागेवर १४३३.६० चौरस मीटर बांधकाम करण्यात आले आहे.