शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटना असुरक्षित करणारी परिस्थिती

By admin | Updated: February 13, 2016 03:02 IST

महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात अहिंसेच्या मार्गानी स्वातंत्र्याचा लढा दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशाविषयी अनेक स्वप्न रंगविले होते.

लीलाताई चितळे : मृणाल गोरे परस्पर विनिमय केंद्रातर्फे चर्चासत्रनागपूर : महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात अहिंसेच्या मार्गानी स्वातंत्र्याचा लढा दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशाविषयी अनेक स्वप्न रंगविले होते. तळागाळातील माणसाच्या सर्वसमावेशक विकासाचा विचार केला होता. मात्र आजची परिस्थिती श्वास कोंडणारी आहे. एकतर्फी राज्यकारभार चालवून लोकभावनेला दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे. असहिष्णुता वाढून पुन्हा जातीव्यवस्था बळकट होताना दिसते. अशा घुसमट होणाऱ्या परिस्थितीत राज्यघटना सुरक्षित राहील काय, हा प्रश्न निर्माण झाला असल्याची भावना ज्येष्ठ समाजसेविका लीलाताई चितळे यांनी व्यक्त केल्या. मृणाल गोरे परस्पर विनिमय केंद्राच्यावतीने ‘अस्वस्थ वातावरण : हिंसा आणि तिची अनेक रूपे’ या विषयाअंतर्गत द्विदिवसीय चर्चासत्राचे आयोजन अमरावती रोडवरील विनोबा विचार केंद्र, सर्वादय आश्रम येथे करण्यात आले आहे. चर्चासत्राच्या उद््घाटन सत्रात अध्यक्ष म्हणून उपस्थित लीलाताई चितळे यांनी दलित, आदिवासी, कामगार यांचे होणारे शोषण आणि देशातील एकूणच परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करीत सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. याप्रसंगी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले व सुरेखा दळवी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. श्रीनिवास खांदेवाले यांनी, भारतीय संस्कृती ही प्रकृतीसोबत चालणारी आहे. मात्र दुसऱ्या जातीधर्माच्या गोष्टी स्वीकारायच्या नाही, असे मानने ही विकृती आहे असे मत व्यक्त केले. समाजात मतभिन्नता असतात, मात्र इतरांचं मत ऐकायचे नाही हे योग्य नाही. दुर्दैवाने सध्या हाच प्रकार सुरू असून ही विकृती संपविल्याशिवाय देश संपन्न होणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सुरेखा दळवी यांनी सामाजिक कुरीती आणि त्याचा उच्छाद मांडणाऱ्यांवर जोरदार टीका केली. परंपरेच्या नावावर अजूनही स्त्रियांचं शोषण सुरू आहे. शनि शिंगणापूर आणि शबरीमाला येथील प्रकार स्त्रीस्वातंत्र्यावरचा मोठा आघात आहे. यातूनच स्त्री-पुरुष अशा लिंगभेदाच्या विखारी विचारांना बळ मिळत असून ही संकुचित मनोवृत्ती आजच्या काळात समानतेला आव्हान देणारी असल्याचे टीका दळवी यांनी केली. उद््घाटन सत्राचे प्रास्ताविक आणि संचालन विलास भोंगाडे यांनी केले.(प्रतिनिधी)