शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये नाराजी !

By admin | Updated: August 3, 2015 02:39 IST

जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा अशा सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपयश मिळाल्यानंतरही जिल्हाध्यक्षपदी सुनीता गावंडे कायम आहेत.

नऊ वर्षे एकहाती धुरा का? : मोहिते, मुळक, केदार गटात अनेक इच्छुकनागपूर : जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा अशा सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपयश मिळाल्यानंतरही जिल्हाध्यक्षपदी सुनीता गावंडे कायम आहेत. गावंडे यांच्याकडे तब्बल नऊ वर्षांपासून जिल्हा काँग्रेसची सूत्रे आहेत. दीर्घकालापासून काँग्रेसची धुरा एकहाती का, असा प्रश्न काँग्रेस वर्तुळात चर्चिला जात आहे. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आ. राजेंद्र मुळक, आ. सुनील केदार यांच्या गोटात जिल्हाध्यक्षपदासाठी बरेच इच्छुक आहेत. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक हे या मुद्यावर काहीच निर्णय घेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे. वासनिकांचा मान म्हणून कुणीही उघडपणे बोलत नसले तरी आतून धुसफूस सुरू असून लवकरच असंतोषाचा स्फोट होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून सुनीता गावंडे यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा अशा तीन निवडणुका झाल्या. मात्र, तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. जिल्हा परिषदेत असलेली सत्ता हातून गेली. लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांना रामटेक मतदारसंघात मोठा पराभव पत्करावा लागला तर, विधानसभा निवडणुकीत सहाच्या सहाही जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शहर अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले. त्यावेळी नागपूर शहर काँग्रेसची धुरा जयप्रकाश गुप्ता यांच्याकडून विकास ठाकरे यांना देण्यात आली. मात्र, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांना कार्यकाळ पूर्ण होऊनही पदावर कायम ठेवण्यात आले. ही बाब पक्षातील नेते व कार्यकर्त्यांना चांगलीच खटकली होती. मात्र, वासनिक यांनी हा निर्णय घेतला असल्यामुळे कुणी उघडपणे विरोध केला नाही. दीड वर्षांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे. जिल्हा परिषद ही मिनी विधानसभेची निवडणूक मानली जाते. या निवडणुकीत ज्यांचा डाव साधला त्यांच्यासाठी पुढील निवडणुका आणखी सोप्या होतात. ग्रामीण राजकारणातील सत्तेची सूत्रे जिल्हा परिषदेतूनच हलविली जातात. मात्र, एवढी महत्त्वाची निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण नाही.प्रदेशाध्यक्षांना साकडे, वासनिकांनाही भेटणारतब्बल तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सलग पराभव झाल्यानंतरही सुनीता गावंडे या जिल्हाध्यक्ष पदावर कायम आहेत. आता त्यांच्याजागी दुसऱ्या सक्षम व्यक्तीला संधी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेऊन केल्याची माहिती आहे. संबंधित शिष्टमंडळ लवकरच माजी मंत्री मुकुल वासनिक यांचीही भेट घेणार आहे. विशेष म्हणजे वासनिक यांच्या विश्वासातील काही नेते मंडळींनीही या मोहिमेला छुपा पाठिंबा देत असल्यामुळे या मोहिमेकडे काँग्रेसमधील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.