नागपूर : येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीवर तीव्र टीका केली. फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले.
वडेट्टीवार म्हणाले की, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, शेतमालाला हमीभाव मिळत नाही, खत–बियाण्यांची टंचाई असून पूरग्रस्तांना योग्य मदत न मिळाल्याने शेतकरी उध्वस्त झाले आहेत. बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, अंगणवाड्यांतील निकृष्ट पोषण व भ्रष्टाचार या मुद्द्यांवरही त्यांनी सरकारची निष्क्रीयता दाखवून दिली.
हर्षवर्धन सपकाळ यांनी जमिनी बळकावण्याच्या प्रकरणात बिल्डर आणि मंत्र्यांचे संगनमत असल्याचा आरोप करत राज्यात मोठ्या प्रमाणावर भूखंड घोटाळे होत असल्याचे म्हटले. चंद्रपूरच्या बरांज कोळसा खाणीत नियमभंग करून अवैध उत्खनन होत असून पर्यावरणीय अटींचे उल्लंघन झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही नेत्यांनी सरकारने आपल्या वर्षभरातील कामकाजाची श्वेतपत्रिका जाहीर करून पारदर्शकता राखावी, अशी मागणी केली.
Web Summary : Congress leaders criticized the Maharashtra government's first year, citing increased farmer suicides, lack of crop prices, corruption, and land scams. They demanded transparency through a white paper on government actions.
Web Summary : कांग्रेस नेताओं ने महाराष्ट्र सरकार के एक साल के कार्यकाल की आलोचना की, जिसमें किसानों की आत्महत्या, फसल की कीमतों की कमी, भ्रष्टाचार और भूमि घोटालों का हवाला दिया गया। उन्होंने सरकार से श्वेत पत्र के माध्यम से पारदर्शिता की मांग की।