Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेसच करू शकते 'उत्तर'चा विकास : गेव्ह आवारी यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 11:28 PM2019-10-09T23:28:59+5:302019-10-09T23:29:21+5:30

उत्तर नागपुरात झालेली विकास कामे ही काँग्रेसच्या काळातच झालेली आहे. यापुढेही उत्तर नागपुरच्या विकासात भर घालण्यास काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचा विश्वास माजी खासदार गेव्ह आवारी यांनी व्यक्त केला.

Congress can only develop 'North': Gave Awari's claim | Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेसच करू शकते 'उत्तर'चा विकास : गेव्ह आवारी यांचा दावा

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेसच करू शकते 'उत्तर'चा विकास : गेव्ह आवारी यांचा दावा

Next
ठळक मुद्देउत्तर नागपुरात कार्यकर्ता संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर नागपूर हा काँग्रेसचा गड राहिला आहे. उत्तर नागपुरात झालेली विकास कामे ही काँग्रेसच्या काळातच झालेली आहे. यापुढेही उत्तर नागपुरच्या विकासात भर घालण्यास काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचा विश्वास माजी खासदार गेव्ह आवारी यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेसचे अनुसूचित जातीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांचे संमेलन अशोकनगरातील गुरुनानक हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गेव्ह आवारी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. नितीन राऊत म्हणाले की, उत्तर नागपुरातील आंबेडकरी जनतेचा काँग्रेसवर विश्वास आहे. आजपर्यंत त्यांनी काँग्रेसला साथ दिली आहे. यंदाही येथील जनता काँग्रेस पक्षाला बळकट करेल. भाजपने विविध प्रकारच्या करांत कपात करण्याचे आश्वासन दिले होते, जीएसटी त्यासाठीच आणला होता. त्यानंतरही कराचा भार कमी झाला नाही. यामुळे महागाई वाढण्यास हातभार लागला, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला. या संमेलनाला विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, किशोर जिचकार, कमलेश चौधरी, आयशा उइके, प्रज्ञा बडवाईक, कांता पराते, कमलेश चौधरी, नरेंद्र जिचकर, विक्रम कदम, विनायक देशमुख, नीरज देशमुख, सुनील सरदार उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्तर नागपुरातून काँग्रेसचे उमेदवार डॉ. राऊत विधानसभेवर पाठविण्याचा दृढनिश्चय केला. उपस्थित सर्वांनी नितीन राऊत यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Congress can only develop 'North': Gave Awari's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.