शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार

By admin | Updated: February 9, 2015 01:01 IST

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाला बळकट करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी त्यांनी देशभरातील २०० तज्ज्ञ नेत्यांशी चर्चा करून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे.

बाला बच्चन : पक्षाला बळकट करण्यासाठी जिल्हानिहाय दौरानागपूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाला बळकट करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी त्यांनी देशभरातील २०० तज्ज्ञ नेत्यांशी चर्चा करून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. कॉंग्रेसचे सचिव बाला बच्चन यांनी रविवारी देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक र्त्यांच्या बैठकीत ही माहिती दिली. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे होते.हा अ‍ॅक्शन प्लॅन अंमलात आणण्यापूर्वी त्यावर पक्षाचे पदाधिकारी व कार्यक र्त्यांची मते व सूचना विचारात घ्याव्या, अशी भूमिका पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची आहे. योग्य सूचनांचा यात समावेश केला जाईल. यासाठी प्रदेश, जिल्हा व तालुका स्तरावर बैठकांचे आयोजन केले असल्याची माहिती बच्चन यांनी दिली.पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. अ.भा.काँगे्रस कमिटीच्या कार्यक्रमानुसार नियोजन करण्यात आले आहे. यातून बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले. पक्षाने दिलेल्या पदाचा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासोबतच पक्ष संघटनेसाठी मदत होते की नाही. याचाही विचार केला व्हावा. पक्षाची आचारसंहिता सर्वांनाच पाळावी लागेल, असे मत त्यांनी मांडले.पक्षाच्या विविध पातळीवरील पदाधिकारी निवडण्याचे व स्थानिक निवडणुकीत आघाडीचे अधिकारी शहर काँग्रेस कमिटीला द्यावे, अशी सूचना माजी मंत्री नितीन राऊ त यांनी मांडली. युवक काँग्रेस हा पक्षाचा कणा आहे. यात निवडणुकीची पद्धती बंद करावी, असे मत माजी मंत्री अनिस अहमद यांनी मांडले.प्रदेश काँग्रेसचे सचिव मुन्ना ओझा यांनी पक्षाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. यावर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पक्षाची विचारसरणी, नेतृत्व, संघटनेत बदल, जाहीरनामा, पक्षाची बांधणी, शिस्त व जबाबदारी अशा १४ मुद्यावर मते व सूचना मांडण्याचे आवाहन त्यांनी केले. राहुल गांधी यांनी देशभरातील युवक काँग्रेसच्या कार्यक र्त्यांशी चर्चा करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी असा दौरा करावा, अशी सूचना अतुल कोटेचा यांनी मांडली. विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील पराभामुळे खचून न जाता कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी, असे आवाहन प्रफुल्ल गुडधे यांनी केले. उमाकांत अग्निहोत्री, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके, जयंत लुटे, तानाजी वनवे, संजय दुधे, दीपक कापसे, विजय बाभरे, अभिजित वंजारी, शेख हुसैन, सुरेश पिल्लेवार, इब्राहीम चुडीवाले आदींनी मनोज साबळे आदींनी विचार मांडले. यावेळी माजी आमदार यादवराव देवगडे, अरुण डवरे व्यासपीठावर होते. डॉ. गजराज हटवार यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)