उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर, नर्सेसचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:09 IST2021-05-14T04:09:52+5:302021-05-14T04:09:52+5:30

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात ...

Congratulations to the doctors and nurses who have done remarkable work | उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर, नर्सेसचा सत्कार

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर, नर्सेसचा सत्कार

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते. यावेळी कोरोना रुग्णांच्या सेवेत उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर व परिचारिकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात मेट्रन वैशाली तायडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. सुशांत मेश्राम, डॉ. कांचन वानखेडे, डॉ. राजेश गोसावी, डॉ. वासुदेव बारसागडे, डॉ. जयेश मुखी , डॉ. मुरारी सिंग,डॉ. सौरभ शहा नर्सेस युनियनचे अध्यक्ष शहजाद बाबा खान यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरिता जांभुळे, सायमन ब्रदर, ज्योती उईके, वंदना लोखंडे, आशा उईके, माया दिघोरे, सुशीला मारस्कोल्हे, त्रिवेणी खंडाते, सुधा दांडेकर, सुजाता मुन, अनिता चव्हाण, माया बावनकर आदी कोरोनायोद्धा उपस्थित होते. संचालन डॉ. पाटील यांनी केले तर आभार सुजाता मून यांनी मानले.

Web Title: Congratulations to the doctors and nurses who have done remarkable work