शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूल, कट्ट्यासह घातक शस्त्रे जप्त

By admin | Updated: July 6, 2015 03:09 IST

पिस्तूल, देशी कट्ट्यासह घातक शस्त्रे घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या खतरनाक गुंडांना जरीपटका आणि हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली.

नागपूर : पिस्तूल, देशी कट्ट्यासह घातक शस्त्रे घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या खतरनाक गुंडांना जरीपटका आणि हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली.जरीपटक्यातील दयानंद पार्क परिसरात शनिवारी ८.३० वाजता गणेश बुटानी पंचधारे (वय ३५, रा. लष्करीबाग), शेखर धनराज सहारे (वय ४१, रा. बारसेनगर), राकेश महेंद्र बाराहाते आणि त्यांचे दोन साथीदार दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती जरीपटका पोलिसांना कळाली. पोलिसांनी लगेच धाव घेत पंचधारे आणि सहारेला पकडले. त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक कट्टा, एक जिवंत काडतूस आणि अ‍ॅक्टिव्हा जप्त करण्यात आली. त्यांचे तीन साथीदार पळून गेले. अशाच प्रकारे नारा गाव ते कोराडी पॉवर हाऊस रोडवर प्रमोद जनकलाल छवले (वय २८, रा. बैरामजी टाऊन), सेलव्हेस्टर विनोद क्रिस्टोपर (वय २१, रा. मोतीबाग), राजकुमार तुळशीराम सिमनकर (वय ३०, रा. मोठा इंदोरा), अमोल शिशुपाल वालदे (वय १९, रा. शांतीनगर) तसेच रमेश विश्वकर्मा हे सर्व शनिवारी सायंकाळी ६.५० च्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. जरीपटका पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्याकडून तलवार, कोयता, चाकू, गुप्ती, स्प्लेंडर आणि ज्युपिटर या दोन दुचाक्या जप्त केल्या. ठाणेदार दीपक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली जरीपटका पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. त्याचप्रमाणे हुडकेश्वर पोलिसांनी म्हाळगीनगर, पाण्याचे टाकीजवळ रोहित उर्फ राज संगिता वाहने (वय २२, रा. उल्हास नगर, ठाणे), राहुल श्याम राऊत (वय १९), राजु गोविंदसिंग चव्हाण (वय १९, रा. दोघेही सुभाषनगर, कामगार कॉलनी), प्रदीप ताराचंद चन्ने (वय २०, रा. पांढराबोडी झोपडपट्टी) या चार आरोपींना दरोडा टाकण्यापूर्वीच अटक केली. त्यांच्या ताब्यातुन तलवार, गुप्ती, २ खंजर, दोरी, मिरची पावडर जप्त केले. (प्रतिनिधी)