शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विभागातील जलसाठय़ाची स्थिती उत्तम

By admin | Updated: May 8, 2014 02:40 IST

नागपूर विभागातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठय़ाची स्थिती राज्यातील इतर विभागाच्या तुलनेत उत्तम आहे.

नागपूर : नागपूर विभागातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठय़ाची स्थिती राज्यातील इतर विभागाच्या तुलनेत उत्तम आहे. नागपूर विभागातील एकूण ३६६ प्रकल्पांत ५ मे रोजी ४४ टक्के जलसाठा होता. राज्याच्या इतर विभागाच्या तुलनेत हा सर्वाधिक आहे.
जलसंपदा विभागाने संपूर्ण राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पातील जलस्तर जाहीर केला आहे. नागपूर विभागातील प्रकल्पाचा जलस्तर अव्वल आहे. नागपूर विभागात मोठे, मध्यम आणि लघु मिळून एकूण प्रकल्पांची संख्या ही ३६६ आहे. त्यातील प्रकल्पीय क्षमता ३८९१ द.ल.घ.मी इतकी असून ५ मे रोजी धरणात १७२९ द.ल.घ.मी (४४ टक्के) पाणीसाठा होता. मागील आठवड्याच्या तुलनेत तो २ टक्के कमी असला तरी मे २0१३ च्या तुलनेत १0 टक्के तर २0१२ च्या तुलनेत २0 टक्के अधिक आहे.
दुसरा क्रमांक अमरावती विभागाचा आहे. या भागातील ३७९ प्रकल्पांत ३९ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के अधिक), कोकण विभागातील १५८ प्रकल्पांमध्ये ३६ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ टक्के कमी), नाशिक विभागातील ३५0 प्रकल्पांमध्ये २९ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्के अधिक), मराठवाड्यातील ८0४ प्रकल्पांमध्ये २६ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत २0 टक्के अधिक), पुणे विभागातील ३६८ प्रकल्पांमध्ये २६ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्के कमी) पाणीसाठा आहे. राज्यातील एकूण २४२५ प्रकल्पांमध्ये ३१ टक्के पाणी आहे. (गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ टक्के अधिक आहे.)
नागपूर विभागातील १६ मोठय़ा प्रकल्पांमध्ये ५१ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्के अधिक) पाणी आहे. पेंच प्रकल्पात ५४ टक्के, रामटेक (सूर) प्रकल्पात ६१ टक्के, नांदमध्ये २५ तर वेणामध्ये २७ टक्के पाणी आहे. विभागातील ४0 मध्यम प्रकल्पांत २५ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत १0 टक्के अधिक) आणि ३१0 लघु प्रकल्पांत २६ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्के अधिक) पाणीसाठा आहे. (प्रतिनिधी)