शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या अखंडतेसाठी राष्ट्रवादाची संकल्पना एक असावी

By admin | Updated: September 30, 2014 00:36 IST

राष्ट्रवादाची संकल्पना एक असेल तर देशाची एकता, अखंडता टिकून राहते. परंतु भारतात महापुरुषांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पना वेगवेगळ्या असून त्यामुळे राष्ट्रवादाची भावना लोप पावत चालली आहे,

मान्यवरांचे मत : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रणीत राष्ट्रवाद’ यावर व्याख्याननागपूर : राष्ट्रवादाची संकल्पना एक असेल तर देशाची एकता, अखंडता टिकून राहते. परंतु भारतात महापुरुषांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पना वेगवेगळ्या असून त्यामुळे राष्ट्रवादाची भावना लोप पावत चालली आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी येथे केले.निळाई सामाजिक, सांस्कृतिक परिवार नागपूरच्या वतीने समता सैनिक दलाचे धर्मपाल मून यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हिंदी मोरभवनात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रणीत राष्ट्रवाद’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत प्रा. रत्नाकर मेश्राम होते. व्यासपीठावर प्रा. अशोक गोडघाटे, प्रा. डॉ. वामन गवई, महालेखाकार दिनेश पाटील उपस्थित होते.यावेळी बोलताना दिनेश पाटील म्हणाले, राज्यघटना कितीही चांगली असली तरी ते वापरणारे लोक चांगले असणे गरजेचे आहे, असे आंबेडकरांचे मत होते. भारतातील नागरिक मिळालेले स्वातंत्र्य गमावतील यासाठी बाबासाहेबांनी घटनेतच तरतूद केल्यामुळे हे स्वातंत्र अजूनही अबाधित आहे. गौतम बुद्धांच्या काळापासून भारतात लोकशाही होती. परंतु नागरिकांना ती टिकवता आली नाही. त्यामुळे लोकशाही टिकविण्यासाठी आंबेडकरांच्या विचारांवर वाटचाल करण्याची गरज आहे. प्रा. डॉ. वामन गवई म्हणाले, गौतम बुद्धांच्या मते मैत्रीभाव म्हणजे राष्ट्रवाद होय. भारतात स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रवादाची संकल्पना वेगवेगळी आहे. आंबेडकरांच्या मते सर्वसामान्य व्यक्तीला स्वातंत्र्य मिळावे हा त्यांचा राष्ट्रवाद होय. आधुनिक काळातील राष्ट्रवादाची संकल्पना विघटनाकडे घेऊन जाणारी आहे. ज्या देशात धर्म राष्ट्रवाद असतो त्या देशात संविधानापेक्षा धर्माचे कायदे श्रेष्ठ ठरतात. राष्ट्रधर्माचे नागरिक प्रथम आणि इतरांना दुय्यम स्थान मिळते. परंतु बाबासाहेबांना कायद्याचे राज्य हवे होते.देशात हिंदू राष्ट्रवाद आल्यास मनुस्मृतीचा कायदा येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक राहुल दहिकर यांनी केले. संचालन प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले. व्याख्यानाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)