शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांना चार वर्षांपासून मानधनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:06 IST

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात ‘आपले सेवा केंद्र’ चालविणाऱ्या १४ संगणक परिचालकांचे तीन महिन्याचे मानधन गेल्या चार वर्षापासून प्रलंबित आहे. ...

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात ‘आपले सेवा केंद्र’ चालविणाऱ्या १४ संगणक परिचालकांचे तीन महिन्याचे मानधन गेल्या चार वर्षापासून प्रलंबित आहे. त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत प्रशासनासोबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. त्यामुळे थकीत मानधन मिळणार कधी, असा सवाल या संगणक परिचालकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत पंचायत विस्तार अधिकारी यशवंत लिखार यांना निवेदन देण्यात आले आहे.

गावातील नागरिकांची कामे गावात व्हावी. शासकीय कामे डिजिटल करण्याच्या उद्देशाने शासनाने प्रत्येक गाव संगणकीकृत केले. त्यामुळे गावातील कामे गावात होण्यास सुरुवात झाली. नागरिकांचा त्रास वाचावा म्हणून ही सर्व व्यवस्था करण्यात आली. या ‘आपले सेवा केंद्रा’वर काम करण्यासाठी संगणक परिचालकांची नेमणूक करण्यात आली. जीवावर उदार होत या संगणक परिचालकांनी कोरोनासारख्या कठीण काळातही कर्तव्य बजावले. परंतु आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

२०१७ मधील एप्रिल,मे,जून अशा तीन महिन्याचे मानधन गेल्या चार वर्षापासून अदा करण्यात आलेले नाही. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे आरटीजीएस सीएससी कंपनीच्या अ‍ॅक्सिस बँक, नेहरू प्लेस, दिल्ली येथील खात्यात जमा करूनदेखील केंद्रचालकाचे मानधन अद्याप जमा करण्यात आलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील १४ केंद्र चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. अनेकदा संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केल्यानंतर पुढील मानधनात देण्यात येईल, अशी बतावणी करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील पंधरवड्यात थकीत मानधन मिळाले नाही तर काम बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या तालुका अध्यक्षा मेघा भिंगारे, उपाध्यक्ष अंकुश तभाणे, सचिव देवेंद्र वांढरे यांच्यासह सर्व केंद्र चालकांच्या वतीने देण्यात आला आहे.

- विस्तार अधिकारी यशवंत लिखार यांना निवेदन देताना संगणक परिचालक.