शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार करताच पाण्याचे बिल १२ हजार रुपयांनी कमी

By admin | Updated: May 31, 2015 02:51 IST

अवास्तव येत असलेल्या पाण्याच्या बिलासंदर्भात समाधान शिबिरात तक्रार दाखल करताच पाण्याचे बिल तब्बल १२ हजार रुपयांनी कमी करण्यात आल्याचा प्रकार यावेळी उघडकीस आला.

आनंद डेकाटे नागपूरअवास्तव येत असलेल्या पाण्याच्या बिलासंदर्भात समाधान शिबिरात तक्रार दाखल करताच पाण्याचे बिल तब्बल १२ हजार रुपयांनी कमी करण्यात आल्याचा प्रकार यावेळी उघडकीस आला. याच कारणासाठी पीडित दाम्पत्य गेल्या तीन वर्षांपासून कार्यालयाच्या चकरा मारत होते. परंतु या शिबिराच्या धास्तीमुळे बिल एकदम कमी झाले. ते सुद्धा शिबिराच्या दोन दिवसांपूर्वी रिव्हाईज पाण्याचे बिल त्यांच्या घरापर्यंत आणून देण्यात आले हे विशेष. असे असले तरी अवास्तव पाण्याचे बिलासंदर्भात ठोस कारवाई न करता अधिकाऱ्यांनी केवळ मीटर बदलवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे या शिबिरातून पीडित दाम्पत्याचे समाधान शेवटी झालेच नाही. उषा आणि देवानंद धांडे असे या पीडित दाम्पत्याचे नाव आहे. हे दाम्पत्य रमानगर रामेश्वरी चौक येथे राहतात. त्यांना पाण्याचे बिल महिन्याला २५० ते ३०० रुपये या दरम्यान येत होते. ते बिल ते नियमितपणे भरायचे. परंतु २०१२ पासून पाण्याचे बिल अचानकपणे अवाढव्य येऊ लागले. सुरुवातीला काही बिल भरले मात्र जेव्हा २७ हजार रुपये बिल येऊ लागले तेव्हा मात्र त्यांनी याविरुद्ध तक्रार केली. माहितीच्या अधिकारात वाढलेल्या बिलासंदर्भात माहिती मागितली. मात्र महापालिकेच्या जलसंपदाय विभागातर्फे त्यांना बिल वाढीसंदर्भात कुठलेही ठोस कारण सांगण्यात आले नाही. किवा त्यांचे ऐकूनही घेण्यात आले नाही. त्यांनी याविरुद्ध आपला लढा सुरूच ठेवला. समाधान शिबिराची घोषणा झाली. ते दक्षिण-पश्चिम मतदार संघात येत असल्याने त्यांनी याच मुद्यावर समाधान शिबिरासाठी तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात त्यांनी अर्ज केला. त्यांना टोकन देण्यात आले. समाधान शिबिराला दोन दिवस शिल्लक असतांना त्यांना आलेल्या २७ हजार रुपयाच्या पाण्याचे बिल तब्बल १२ हजार रुपयांनी कमी करून १५ हजार रुपयाचे रिव्हाईज बिल पाठविण्यात आले. हे बिल सुद्धा अवास्तव होते. त्यामुळे या दाम्पत्यांनी समाधान शिबिरात महापालिकेच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली. अवास्तव बिलासंदर्भात त्यांची तक्रार होती. त्यावर ठोस काहीही न करता अधिकाऱ्यांनी केवळ मीटर बदलूून देण्याचा सल्ला दिला. ज्या मुद्यासाठी आम्ही गेल्या तीन वर्षांपासून भांडत आहोत, तो मुद्दा आजही कायम आहे, त्यामुळे आमचे समाधान झालेले नाही, असे धांडे दाम्पत्यांचे म्हणणे होते.