शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची चुकीची माहिती देणाऱ्या डॉक्टर विरोधात एमएमसीकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:03 IST

कोरोना विषाणू संदर्भात चुकीची माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबई येथील एका डॉक्टरचा आहे. यात त्या डॉक्टरने मास्क लावण्याची गरज नसल्याचे व संभ्रमित करणारी माहिती दिली आहे.

ठळक मुद्देआयएमए अध्यक्ष भोंडवे : संभ्रमित, भीतीदायक मजकुरावर कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणू संदर्भात चुकीची माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबई येथील एका डॉक्टरचा आहे. यात त्या डॉक्टरने मास्क लावण्याची गरज नसल्याचे व संभ्रमित करणारी माहिती दिली आहे. या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमएमसी) तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती ‘आयएमए’ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.डॉ. भोंडवे म्हणाले, कोरोना विषाणूवर प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे अनेक चुकीचे सल्ले सोशल मीडियातून येत आहे. नागरिकांसाठी व रुग्णांसाठी ते घातक ठरत आहे. म्हणून कोरोनाशी संबंधित संभ्रमित करणारा, भीती दाखवणारा संदेश सोशल मीडियात आढळून आल्यास अन्य कुणालाही पाठवण्याऐवजी ‘आयएमए’कडे पाठवा. यासाठी ‘९८२३०८७५६१’ व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या संदेशाचे ‘आयएमए’च्या डॉक्टरांकडून त्वरित विश्लेषण केले जाईल आणि त्याची सत्यता सांगणारा संदेश त्या व्यक्तीला त्वरित पाठवला जाईल. अशा प्रकारचा संदेश जर खूप गैरसमज आणि भीतीदायक वातावरण पसरवणारा असेल तर मूळ संदेश पाठविणाºया व्यक्तीविरुद्ध ‘सायबर क्राईम’ अंतर्गत पोलिसात तक्रारही केली जाईल, असा इशाराही डॉ. भोंडवे यांनी दिला. यावेळी त्यांनी कोरोनावरील उपाययोजनांवर महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग उत्तम कामगिरी करीत असल्याचेही सांगितले. पत्रपरिषदेला आयएमएचे नागपूर अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला, सचिव डॉ. मंजुषा गिरी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक आढाव, डॉ. नाईक, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. संजय देशपांडे, डॉ. वंदना काटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोनाdoctorडॉक्टर