शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

लघु, मध्यमच्या तुलनेत मोठे सिंचन प्रकल्प भरलेले

By admin | Updated: May 28, 2014 00:53 IST

एरवी उन्हाळ्यात कोरडे पडणार्‍या मोठय़ा सिंचन प्रकल्पाची स्थिती यंदा मात्र समाधानकारक आहे. मोठय़ा प्रकल्पांच्या तुलनेत लघु आणि मध्यम प्रकल्पांत पाण्याची पातळी खाली घसरली असून,

नागपूर : एरवी उन्हाळ्यात कोरडे पडणार्‍या मोठय़ा सिंचन प्रकल्पाची स्थिती यंदा मात्र समाधानकारक आहे. मोठय़ा प्रकल्पांच्या तुलनेत लघु आणि मध्यम प्रकल्पांत पाण्याची पातळी खाली घसरली असून, या प्रकल्पात पाणीसाठा सरासरी २२ टक्के आहे. त्यातुलनेत मोठय़ा प्रकल्पात मे महिन्याच्या अखेरीस ४८ टक्के पाणीसाठा आहे.

नागपूर विभागात एकूण १६ मोठे सिंचन प्रकल्प आहेत. त्यांची प्रकल्पीय क्षमता २८५६ द.ल.घ.मी. असून, सध्या त्यात १३७८ द.ल.घ.मी. म्हणजे एकूण साठय़ाच्या ४८ टक्के पाणी आहे.

गेल्या आठवड्यात १४0१ द.ल.घ.मी. पाणी होते. या आठवड्यात २३ द.ल.घ.मी.ने ही पातळी कमी झाली. मात्र संपूर्ण राज्याचा विचार केला तर सर्वाधिक जलसाठा नागपूर विभागातील मोठय़ा प्रकल्पातच आहे. कोकणातील प्रकल्पात ३७ टक्के, मराठवाड्यातील प्रकल्पात ३७ टक्के, अमरावती विभागाच्या प्रकल्पात ४0 टक्के, नाशिक २१ टक्के आणि पुणे विभागातील प्रकल्पात १८ टक्के पाणी आहे.

मोठय़ा प्रकल्पांच्या तुलनेत मध्यम आणि लघु प्रकल्पात कमी पाणी आहे. नागपूर विभागात ४0 मध्यम प्रकल्प असून, त्यात एकूण प्रकल्प क्षमतेच्या (५५१ द.ल.घ.मी.) २२ टक्के (१२१ द.ल.घ.मी.) जलसाठा आहे. मागील आठवड्यात या प्रकल्पात १२३ द.ल.घ.मी. पाणी होते.

राज्यातील इतर विभागाचा विचार केला तर मध्यम प्रकल्पातील जलसाठय़ांमध्ये अमरावती विभागाची स्थिती चांगली आहे. या भागातील प्रकल्पात ३९ टक्के जलसाठा आहे. कोकणात २४ टक्के, मराठवाड्यात २१ टक्के, नाशिकमध्ये २९ टक्के तर पुणे विभागातील मध्यम सिंचन प्रकल्पात २२ टक्के पाणी आहे.

नागपूर विभागात ३१0 लघु प्रकल्प असून, त्यात सध्या २२ टक्के पाणी आहे. (एकूण प्रकल्पीय क्षमता ४८३ द.ल.घ.मी., सध्याचा जलसाठा १0६ द.ल.घ.मी.) गेल्या आठवड्यात या प्रकल्पात ११0 द.ल.घ.मी. पाणीसाठा होता. एका आठवड्यात १ टक्क्याने त्यात घट झाली.

यंदा मान्सून वेळेआधीच बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ही शक्यता खरी ठरली तर दिलासादायक चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)