शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

चित्रांश कंपनीच्या कार्यालयात हंगामा

By admin | Updated: March 4, 2015 02:27 IST

दुकानांमध्ये टीव्ही संच लावून, त्यातून जाहिरातीचे प्रक्षेपण करून, त्या

लाभार्थ्यांचे चेक बाऊ न्स : पोलिसांची मध्यस्थीनागपूर : दुकानांमध्ये टीव्ही संच लावून, त्यातून जाहिरातीचे प्रक्षेपण करून, त्या मोबदल्यात दुकानमालकांना महिन्याला सात हजार रुपये देण्याची योजना चित्रांश टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनी शहरात राबवित आहे. या योजनेतील काही लाभार्थ्यांचे धनादेश न वटल्याने, त्यांनी मंगळवारी कंपनीच्या श्रीराम टॉवर येथील कार्यालयात हंगामा केला. चित्रांश टेक्नॉलॉजी प्रा.लि. ही जाहिरात कंपनी आहे. कंपनीने ७ ते ८ महिन्यांपासून शहरात अभिनव योजना राबविली आहे. कंपनी शहरातील दुकानमालकांकडून ३५ ते ४० हजार रुपये घेऊन टीव्ही संच लावते. या टीव्हीवर मोठमोठ्या कंपनीच्या जाहिरातीचे प्रक्षेपण करते. या मोबदल्यात दुकानमालकांना महिन्याला सात हजार रुपये दिले जातात. काही लाभार्थ्यांचा धनादेश दोन महिन्यापासून वटला नाही. हे लाभार्थी काही दिवसांपासून कार्यालयाच्या चकरा मारत आहे. अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क करीत आहे. मात्र त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असल्याने, आज शेकडो लाभार्थ्यांनी कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. पैशासाठी कार्यालयात जोरदार हंगामा केला. दरम्यान सदर पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी मध्यस्थी केल्याने, लाभार्थ्यांना पुन्हा मोबदल्याचा चेक देण्यात आला. कंपनीच्या कार्यालयात जवळपास तीन तास हंगामा सुरू होता. लाभार्थ्यांनी कंपनीवर आरोप केले असले तरी, या प्रकरणाची कुठलीही तक्रार पोलिसांकडे केली नाही. (प्रतिनिधी) 

कंपनीने आमची फसवणूक केली४या कंपनीने लाभार्थ्यांशी तीन वर्षाचे अ‍ॅग्रीमेंट केले आहे. यात पहिले सहा महिने लाभार्थ्यांना ७ हजार, ६ ते १२ महिन्यापर्यंत ८ हजार व १२ ते ३६ महिन्यापर्यंत १०,००० रुपये देईल, असा करारात उल्लेख आहे. मात्र पहिल्या सहा महिन्यातच कंपनीचे धनादेश वटविण्यात अडचणी येत आहे. हंगामा करणाऱ्या काही लाभार्थ्यांनी कंपनी आमची फसवणूक करीत असल्याचा आरोप केला. आमचे पैसे परत द्या, आपला टीव्ही घेऊन जा, अशी मागणी त्यांनी केली.  

दुसऱ्या कंपनीची चाल आहे४या कंपनीतील एक अधिकाऱ्याने कंपनीचा राजीनामा देऊन, दुसरी कंपनी स्थापन करून अशीच योजना राबविली आहे. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी कंपनीची ही चाल असल्याचे सांगून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना समजविले.जवळपास ७० हजार ग्राहक !४या कंपनीने संपूर्ण जिल्ह्यात जाळे पसरविले आहे. जवळपास ७० हजार ग्राहक असल्याची माहिती आहे. प्रतिमाह ७ हजार रुपयांच्या लालसेपोटी अनेक ग्राहकांनी कर्ज काढून ३५ ते ४० हजार रुपये कंपनीकडे जमा केले आहे.