शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉमन मॅन’चा प्रेरणास्रोत हरवला

By admin | Updated: January 28, 2015 01:01 IST

प्रसिद्ध व्यगंचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या निधनाने नागपुरातील त्यांच्या शिष्य परिवारातही शोककळा पसरली आहे. त्यांनी घडविलेले अनेक व्यंगचित्रकार सध्या विविध ठिकाणी व्यंगचित्रातून सामाजिक

उपराजधानीतील व्यंगचित्रकारांची प्रतिक्रियानागपूर: प्रसिद्ध व्यगंचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या निधनाने नागपुरातील त्यांच्या शिष्य परिवारातही शोककळा पसरली आहे. त्यांनी घडविलेले अनेक व्यंगचित्रकार सध्या विविध ठिकाणी व्यंगचित्रातून सामाजिक भाष्य करीत आहे. चालती बोलती कार्यशाळाच - संजय मोरे आमचे मित्र कैलास भिंगारे यांनी मुंबईत व्यंगचित्रकारांचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्यात बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण यांच्यासह मलाही संधी लाभली होती. त्यावेळीच त्यांच्याशी माझी ओळख झाली आणि तीन दिवस त्यांच्या सहवासात घालविता आले. यानिमित्ताने व्यंगचित्रकार केवळ व्यंगचित्रकार नसतो तर तो समाजाचा भाष्यकारही असतो. त्यामुळे व्यंगचित्रकाराची जबाबदारी फार मोठी असल्याचे ते म्हणाले होते. मी त्यांच्यापेक्षा लहान असूनही त्यांनी माझ्याशी संवाद साधून मला खूप काही सांगितले. प्रोत्साहन दिले. अत्यंत निगर्वीपणे वागणारे आर. के. म्हणजे चालती - बोलती कार्यशाळाच होती. त्यांची कॉपी करूनच मी या क्षेत्रात प्रारंभ केला. मे महिन्यात त्यांच्या प्रदर्शनाचे पुन्हा आयोजन करण्यात आले होते पण त्यापूर्वीच त्यांनी निरोप घेतला. विविध स्थितीवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी केलेले भाष्य नेहमीच प्रेरणा देत राहिल, असे व्यंगचित्रकार संजय मोरे यांनी सांगितले. घटनांकडे वेगळ्या नजरेने पाहणारे कलावंत -चारोळेएखादी घटना दिसते तसे सारेच सत्य नसते. त्याचे अनेक अंडरकरंट असतात. ते शोधले पाहिजे आणि त्यासाठी समाजाचा, राजकीय स्थितीचा अभ्यास असला पाहिजे, हे आर. के. लक्ष्मण यांच्याकडूनच शिकलो. १५ वर्षांपूर्वी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे कार्टुनिस्ट सेमीनार झाले होते. त्यावेळी ते नागपुरात आले होते. तेव्हा त्यांच्याकडून बऱ्याच बाबी शिकता आल्या. त्यावेळी मी विद्यार्थी असल्याने कार्टुनिस्ट व्हायचे, हे ठरवले नव्हते पण त्यांच्यामुळेच या क्षेत्रात मी आलो. सामाजिक विषयावर चित्रांच्या माध्यमातून भाष्य करण्याची आणि कॉमन मॅनची भावना नेमकेपणाने पकडण्याची त्यांची हातोटी वादातीत होती. त्यांच्या निधनाने फार मोठा मार्गदर्शक आणि भाष्यकार हरविल्याचे दु:ख वाटते, अशी संवेदना व्यंगचित्रकार उमेश चारोळे यांनी व्यक्त केली. एकाग्रतेने काम करणारा कलावंत -अकोलवारआर. के. लक्ष्मण माझे चांगले मित्र होते. अनेक वर्षे त्यांच्यासह काम करण्याचा अनुभव घेता आला. सातत्याने आमच्या भेटी व्हायच्या आणि त्यांचे विचार समजून घेता यायचे. ते व्यंगचित्र काढत असताना कुणी गप्पा मारलेल्या त्यांना अजिबात चालत नव्हत्या. कारण त्यामुळे आपली एकाग्रता भंग होते आणि जो परिणाम साधायचा तो साधता येत नाही, असे त्यांचे मत होते. कामाप्रती अतिशय गंभीर असणारा हा कलावंत होता. धनवटे रंगमंदिरात त्यांचा आणि माझा एक प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमाचे नावही ‘कॉमन मॅन’ असेच होते. त्यावेळी धनवटेला प्रचंड गर्दी झाली. मी आणि त्यांनी काही सादरीकरण केले. त्यात त्यांचे स्ट्रोक्स जबरदस्त परिणामकारक होते. त्यांच्यासारखा कावळा तर आतापर्यंत कुणी चितारू शकले नाही. प्रतिकांचा योग्य उपयोग ते व्यंगचित्रातून करायचे. नागपूर पत्रकार भवनातर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यांचे बाळासाहेब ठाकरेंशी जवळचे संबंध होते. चांगला कार्टुनिस्ट असताना त्यांनी राजकीय पक्ष काढल्याचा त्यांना राग आला पण त्यांची मैत्री कायम होती. त्यांच्या निधनाने एक मोठा मित्र हरविल्याचे दु:ख आहे, अशी शोकसंवेदना ज्येष्ठ व्यंगचित्रकार विष्णू अकोलवार यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)