विदर्भात थंडीची लाट कायम, पारा ८ अंशावर ! २४ तासानंतर दिलासा मिळण्याची शक्यता
By निशांत वानखेडे | Updated: January 7, 2026 19:54 IST2026-01-07T19:53:58+5:302026-01-07T19:54:34+5:30
Nagpur : मंगळवारी जबरदस्त हुडहुडी भरविल्यानंतर बुधवारी किमान तापमानात अंशत: वाढ झाली असली तरी थंडीची लाट कायम आहे. नागपूरचा पारा २४ तासात ०.४ अंशाने वाढून ८ अंशाची नाेंद झाली.

Cold wave continues in Vidarbha, mercury at 8 degrees! Relief likely after 24 hours
नागपूर : मंगळवारी जबरदस्त हुडहुडी भरविल्यानंतर बुधवारी किमान तापमानात अंशत: वाढ झाली असली तरी थंडीची लाट कायम आहे. नागपूरचा पारा २४ तासात ०.४ अंशाने वाढून ८ अंशाची नाेंद झाली. वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे शरीराला कापरे भरविणारी स्थिती तशीच आहे. पुढचे २४ तासही थंडीच्या लाटेमुळे गारठा सहन करावा लागेल, असा अंदाज आहे. राज्यातील थंडगार शहरांच्या यादीत गाेंदिया ७.६ अंशासह आजही टाॅपवर कायम आहे.
१ जानेवारीपासून ढगाळ वातावरणामुळे नागरिक उबदारपणाचा अनुभव येत हाेते, पण ६ जानेवारीला तापमान धाडकन खाली काेसळले आणि उष्णतेतून थेट थंड लाटेच्या स्थितीत प्रवेश केल्याने शरीराला कापरे भरले हाेते. नागपूरचे ७.६ व गाेंदियाचे किमान तापमान ७ अंशावर खाली काेसळले. हे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान हाेते. बुधवारी त्यात केवळ अंशत: वाढ झाली पण थंडीचा तडाखा तसाच आहे. दिवसा सूर्यकिरणांमुळे थाेडा काय ताे दिलासा मिळत आहे. दिवसाचे कमाल तापमान मात्र एका अंशाने वाढून २८.८ अंशाची नाेंद झाली. दरम्यान बुधवारी पश्चिम विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात पारा खाली काेसळला. येथे २४ तासात ५.२ अंशाची घसरण हाेत तापमान ९.८ अंशावर पडले. थंडीची ही लाट पुढचे २४ तास कायम राहणार असून त्यानंतर काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. मात्र जानेवारी महिना थंडीत जाणार, असा अंदाज आहे.
जानेवारीचे दशकातील सर्वात थंड दिवस
शंभर वर्षापूर्वी १९३७ साली ७ जानेवारीला नागपूरचे किमान तापमान ३.९ अंशावर गेले हाेते, जाे विक्रम आहे. २०१९ साली ३० जानेवारीला तापमान ४.६ अंशावर गेले हाेते, जे दशकातील सर्वात कमी तापमान ठरले.
वर्ष दिनांक किमान तापमान (अंशात)
२०१६ ३० ५.१
२०१७ १३ ७.२
२०१८ २७ ८
२०१९ ३० ४.६
२०२० ११ ५.७
२०२१ ३१ १०.३
२०२२ २७ ७.६
२०२३ ८ ८
२०२४ २५ ८.७
२०२५ ९ ८.२