शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीवर गोंधळ

By admin | Updated: February 13, 2016 02:55 IST

स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या २० शहरात उपराजधानीचा समावेश होईल, असा विश्वास शहरातील जनतेला होता.

मनपा सभागृह : चर्चा नाकारल्याने विरोधकांचा बहिष्कारनागपूर : स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या २० शहरात उपराजधानीचा समावेश होईल, असा विश्वास शहरातील जनतेला होता. परंतु केंद्र सरकारने नागपूरचा समावेश केला नाही. आपण कुठे कमी पडलो, याची माहिती सदस्यांना होणे गरजेचे आहे. त्यामुळे या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी केली. परंतु महापौर प्रवीण दटके यांनी चर्चा नाकारल्याने विरोधी सदस्य जोरदार नारेबाजी करीत वेलमध्ये आले व त्यांनी कामकाजावर बहिष्कार घातला.स्मार्ट सिटीच्या यादीत नागपूरचा समावेश व्हावा, अशी शहरातील नागरिकांची इच्छा आहे. परंतु तो का झाला नाही, याची माहिती जाणून घेण्यासाठी शहरातील नागरिकांना उत्सुकता आहे. महापालिका कुठे कमी पडली त्यामुळे यावर चर्चा व्हावी अशी मागणी ठाकरे व प्रफुल्ल गुडधे यांनी केली. सभागृहाच्या कामकाजात स्मार्ट सिटीचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पुढील सभागृहात या विषयाचा चर्चेसाठी समावेश करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात येतील. यावर विस्तृत चर्चा केली जाईल, असे आश्वासन दटके यांनी दिले. परंतु यावर विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. वेळ असल्याने आताच चर्चा घ्या, अशी मागणी करीत सदस्य कॉंग्रेस वेलमध्ये आले जोरदार नारेबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाच्या सदस्यांनीही या मागणीला पाठिंबा दिला. विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. (प्रतिनिधी)रीतसर नोटीस द्यावी सत्तापक्षाची सभागृहात कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची तयारी आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पावर चर्चेची आमची तयारी आहे. स्मार्ट सिटीच्या यादीत नागपूर राज्यात तिसऱ्या तर देशभरात ३१ व्या स्थानावर आहे. महापालिका कायद्यानुसार सदस्यांना नोटीस देऊ न चर्चा उपस्थित करता येते. त्यानुसार विरोधीपक्षाने नोटीस देण्याची गरज होती. पुढील सभागृहात विरोधी सदस्यांनी नोटीस दिली नाही, तरीही या विषयावर चर्चा करू.प्रवीण दटके, महापौरविकास शुल्क व कर किती वाढणार?स्मार्ट सिटीत नागपूरचा समावेश व्हावा, अशी जनतेची इच्छा आहे. सभागृहात महत्त्वाचे विषय संपले होते. वेळ असल्याने या महत्त्वाच्या विषयावर चर्चेची मागणी केली. चर्चेतून नागपूरचा स्मार्ट सिटीत नंबर का लागला नाही, केंद्राकडे परत प्रस्ताव पाठविणार का, यामुळे शहरातील जनतेवर वाढीव कर व विकास शुल्काचा किती बोजा पडणार याची जनतेलाही माहिती झाली असती. महापौरांच्या मनात असते, तर चर्चा करता आली असती. विरोधक म्हणून आमची भूमिका मांडली. आता पुढील सभेत चर्चा घडवून आणू. तसेच १६ फेब्रुवारीला मनपातील भ्रष्टाचार, स्मार्ट सिटी या मुद्यावरून महापालिका कार्यालयापुढे आंदोलन करूविकास ठाकरे, विरोधी पक्षनेते, महापालिका