शहरं
Join us  
Trending Stories
1
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
2
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
3
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
6
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
7
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
8
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
9
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
10
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
11
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
12
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
13
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
14
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
15
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
16
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
17
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
18
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
19
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
20
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या लीडसोबत दावेदारही वाढले

By admin | Updated: May 20, 2014 00:49 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडी घेत एकतर्फी विजय नोंदविला. आता गडकरींच्या

पश्चिम व दक्षिणमध्ये घमासान : काँग्रेसमध्येही रस्सीखेच

कमलेश वानखेडे - नागपूर

लोकसभा निवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडी घेत एकतर्फी विजय नोंदविला. आता गडकरींच्या या विजयात आपला मोलाचा वाटा असल्याचे दावे विधानसभेसाठी इच्छुक असणार्‍यांकडून केले जात आहेत. भाजपची लीड वाढलेली दिसताच पश्चिम नागपूर व दक्षिण नागपुरात उमेदवारीसाठी इच्छुकांचीही संख्या वाढली आहे. या दोन्ही मतदारसंघात प्रत्येकी चार ते पाच दावेदार असल्यामुळे तिकीट मिळविण्यासाठी मोठी चुरस पहायला मिळणार असून यातून अंतर्गत नाराजी उफाळून येण्याचा धोका दिसू लागला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपुरात भाजपचे आ. सुधाकरराव देशमुख यांनी काट्याच्या लढतीत काँग्रेसचे अनिस अहमद यांना जेमतेम... हजार मतांनी मात दिली. या वेळी नगरसेवक प्रकाश गजभिये व नितीश ग्वालबंसी हे बंडखोरी करीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. गजभिये यांनी २२ हजार मते तर ग्वालबंसी यांनी १२ हजार एवढी मते घेतली. यातील बहुतांश मते काँग्रेसच्या वाट्याचीच होती. असे असतानाही सुधाकरराव काठावर तरले. या आकडेवारीच्या आधारावर लोकसभा निवडणुकीचे अंदाज बांधले जात होते. येथे काँग्रेस दोन-चार हजारानी का होईना पण पुढे राहील, असे दावे केले जात होते. मात्र, बहुसंख्य दलित, मुस्लीम, ख्रिश्चन, आदिवासी, कुणबी मतदार असलेल्या पश्चिममध्ये गडकरींनी तब्बल ३७ हजार १५ मतांची आघाडी घेतली.लोकसभा निवडणुकीपूर्वी सुधाकरराव देशमुख हे आता विधानसभेची निवडणूक लढणार नाहीत, त्यांच्या जागी दुसरा उमेदवार दिला जाईल, अशी चर्चा भाजपच्या गोटात रंगली होती. तशी मानसिक तयारीही देशमुख समर्थकांनी चालविली होती. मात्र, लोकसभेची लीड पाहताच देशमुख समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. ‘लीड पर रहा वेस्ट, सुधाकराव है बेस्ट’ असे त्यांचे समर्थक बोलू लागले आहेत. सुधाकरराव गडकरींचे निवडणूक प्रभारी होते. संघशिक्षक असल्यामुळे संघाच्याही जवळचे आहेत. त्यांची मर्जी विचारात घेऊनच त्यांच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल, असा दावा समर्थक करीत आहेत. असे असले तरी लोकसभा निवडणुकीत अपक्ष नगरसेवक मुन्ना पोकुलवार, मीना चौधरी यांचे पुत्र कमलेश चौधरी यांची मोट बांधून गडकरींसाठी जोमाने लागलेले अपक्ष नगरसेवक परिणय फुके यांच्या भाजपकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आरोग्य शिबिर, विविध अभियानाच्या माध्यमातून ते पश्चिममध्ये कामाला लागले आहेत. आपल्याला कामाचे फळ मिळेल, असा त्यांना विश्वास आहे. पण सुधाकररावांनी थांबायचे ठरवले तरी त्यांच्या जागेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम करणार्‍या जुन्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. प्र्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शशिकांत बोदड, राष्ट्रीय नेते संजय जोशी यांच्याशी मैत्री असलेले रमेश चोपडे, नगरसेवक जगदीश ग्वालबंसी, माजी महापौर मायाताई इवनाते, नगरसेवक साधना बरडे, भूषण शिंगणे यांचाही दावा तगडा आहे. त्यामुळे सुधाकररावांनी गादी सोडली तर भाजपची डोकेदुखी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्येही मलखांब सुरू आहे. राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी लोकसेवा प्रतिष्ठानाच्या माध्यमातूम काम सुरू केले आहे. काँग्रेसचे काही नगरसेवक त्यांनी हाताशी धरले आहेत.