ग्रामीण भागातील नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST2020-12-02T04:09:41+5:302020-12-02T04:09:41+5:30

कामठी : ग्रामीण भागातील नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कामठी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी अंशुजा गराटे ...

Citizens in rural areas should take advantage of the Prime Minister's Housing Scheme | ग्रामीण भागातील नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यावा

ग्रामीण भागातील नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यावा

कामठी : ग्रामीण भागातील नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कामठी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी केले. तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायत सभागृहात आयोजित महाआवास योजना अभियान सप्ताह कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना गराटे बोलत होत्या. यावेळी सरपंच वनिता इंगोले उपस्थित होत्या. गराटे म्हणाल्या, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी ज्या लाभार्थ्यांनी आवेदनपत्र केले होते. त्यांचे प्रपत्र ब मधील पात्र योजनेतील लाभार्थ्यांनी करारनामे करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वडोदा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अनिल सांगोळे यांनी केले.

Web Title: Citizens in rural areas should take advantage of the Prime Minister's Housing Scheme