शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

चीनकडून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न : हेमंत महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:09 IST

चीनला भारताची प्रगती नको आहे. त्यामुळेच विविध माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) हेमंत महाजन यांनी केले आहे.

ठळक मुद्देपाकव्याप्त काश्मीर सहज मिळवण्याची भारतीय लष्कराची क्षमता

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इतर देशांच्या तुलनेत भारताच्या विकासाचा वेग जास्त आहे. मात्र देशासमोर सीमेवरील व अंतर्गत दहशतवादाची मोठी समस्या आहे. जर दहशतवाद व नक्षलवाद संपले तर भारताचा वेगाने विकास होईल. नेमकी हीच बाब चीनला माहीत आहे. त्यामुळेच पाकिस्तानला दहशतवादी कृत्यांमध्ये सातत्याने चीनचे पाठबळ राहिले आहे. चीनला भारताची प्रगती नको आहे. त्यामुळेच विविध माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) हेमंत महाजन यांनी केले आहे.विश्व संवाद केंद्रात त्यांनी देशातील अंतर्गत व बाह्य सुरक्षेच्या स्थितीबाबत माहिती दिली. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० संपुष्टात आल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर काश्मीर भारताचा हिस्सा नसल्याचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला. जर पाकिस्तानचा नकाशा पाहिला तर त्या देशाचे किती तुकडे पडू शकतात याची जाणीव होते. सिंध प्रांत, बलुचिस्तानमध्ये तर खदखद आहेच. गिलगिट-बाल्टीस्तानमधील लोक भारतासोबत आहेत. एकेकाळी पाकिस्तानचे ९० टक्के सैन्य सीमेवर असायचे. आता ही संख्या ५० टक्क्यांवर आली आहे. पाकिस्तानच्या अंतर्गत भागात दहशतवाद वाढला असून वरील राज्यांमध्येदेखील सशस्त्र विरोध सुरू आहे. अशा स्थितीत पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेणे भारतासाठी सहज शक्य आहे, असे हेमंत महाजन म्हणाले. बांगलादेशमधून होणारी घुसखोरी हा देशासमोरील मोठा प्रश्न आहे. यासंदर्भात कडक पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील काही वर्षांत ईशान्येकडील काही राज्यात बांगलादेशी मूळ असलेला मुख्यमंत्री पहावा लागू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भारताने ‘एलओसी’सोबत सागरी सीमांवरदेखील गस्त वाढविण्याची गरज आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.भारताने मागील काही काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर सामरिक तसेच कूटनीती शक्ती दाखविली आहे. मात्र आता सौम्यशक्तीचादेखील वापर करायला हवा. संस्कृती, कला, संगीत इत्यादींच्या माध्यमातून जगात एक वेगळा संदेश नेण्यावर भर दिला पाहिजे, असेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतTerrorismदहशतवाद