शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडीचा मृत्यू, आई-वडील जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:06 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली. त्यात राेडवर फेकल्या गेलेल्या दाेन ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली. त्यात राेडवर फेकल्या गेलेल्या दाेन वर्षीय चिमुरडीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिचे आई, वडील व अन्य एक तरुणी असे तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना कळमेश्वर शहरातील ब्राह्यणी फाटा टी पाॅईंटजवळ शनिवारी (दि. ३) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

लायबा समशेर शेख (२) असे दुर्दैवी चिमुरडीचे नाव असून, या अपघातात तिची आई अफरोज समशेर शेख (३०), वडील समशेर रहमान शेख (३८) व परविन अजिस शेख (२५), सर्व रा. काेहळी, ता. कळमेश्वर हे तिघे गंभीर जखमी झाले. समशेर, पत्नी अफराेज, मुलगी लायबा व परवीन कामानिमित्त एमएच-४०/एएस-१६३२ क्रमांकाच्या ॲक्टिव्हाने काेहळीहून कळमेश्वरला येत हाेते. समशेर दुचाकी चालवित हाेते तर इतर मागे बसले हाेते.

ते कळमेश्वर शहरातील ब्राह्यणी फाटा टी पाॅईंटजवळ पाेहाेचताच कळमेश्वरहून काटाेलच्या दिशेने वेगात जाणाऱ्या एमपी-०९/एचजे-५५२६ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली. यात लायबाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिचे आई, वडील व अन्य एक तरुणी गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांनाही उपचारासाठी तर लायबाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. प्रथमाेपचार केल्यानंतर तिघांनाही नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेत ट्रकचालकास अटक केली. त्या ट्रकचालकाचे नाव कळू शकले नाही.

...

लायबाच्या डाेक्याला गंभीर दुखापत

ट्रकने ॲक्टिव्हाला धडक देताच लायबा चेंडूसारखी वर फेकली गेली आणि ती डाेक्याच्या भागाने राेडवर आदळली. यात डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिच्या घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाय, ॲक्टिव्हा ट्रकच्या समाेरच्या चाकाखाली येण्यावाचून थाेडक्यात वाचले. तिघेही बाहेरच्या भागाला फेकल्या गेल्याने ते जखमी झाले.