शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बाल गुन्हेगारी वाढतेय

By admin | Updated: April 3, 2017 02:53 IST

उपराजधानीतील बालगुन्हेगारीचे स्वरूप दिवसेंदिवस भयावह होत आहे. अल्पवयीन असल्यामुळे प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या प्रेयसीच्या

भयावह रूप मूळावर घाव भविष्यातून उठविण्याचे प्रयत्न नरेश डोंगरे  नागपूर उपराजधानीतील बालगुन्हेगारीचे स्वरूप दिवसेंदिवस भयावह होत आहे. अल्पवयीन असल्यामुळे प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या प्रेयसीच्या संपूर्ण कुटुंबालाच संपविण्याचा घाट घालणारे नंदनवनमधील प्रकरण शनिवारी उजेडात आले. त्यानिमित्तानेच उपराजधानीत निर्ढावलेल्या बालगुन्हेगारीचा गंभीर विषय चर्चेला आला आहे. काय चांगले, काय वाईट या मधील फरकही ज्यांना कळत नाही, ती १२-१५ वर्षे वयोगटातील मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यांच्याकडून घडलेले गुन्हे संबंधितांना भविष्यातूनच उठविणारे आहे. त्यामुळे बालगुन्हेगारीचा विषय अधिकच गंभीर बनला आहे. उपराजधानीत घडलेल्या आणि गेल्या महिनाभरात पोलिसांनी उघड केलेल्या गंभीर गुन्ह्यात २५ अल्पवयीन मुले सहभागी (आरोपी) असल्याचे उघड झाले आहे. त्यातील काहींनी केलेले गुन्हे सराईत गुंडांनाही तोंडावर हात ठेवायला लावणारे आहेत. चोऱ्या, घरफोड्या, फसवणूक, हाणामाऱ्या, अपहरण (पळवून नेणे)च नव्हे तर, या बालगुन्हेगारांनी (कायद्याच्या भाषेत विधीसंघर्षग्रस्त बालकांनी) बलात्कार आणि कटकारस्थान करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचेही गुन्हे केले आहेत. अवघे १६ आणि १७ वर्षे वय असलेली मुलगी-मुलगा एकमेकाच्या कथित प्रेमात आंधळे होतात. चार महिन्यांपुर्वी घरून पळून जातात. मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलीस त्यांना शोधतात. मुलीला पालकांच्या हवाली करतात तर, मुलाला रिमांड होममध्ये घालतात. दोन आठवड्यांपूर्वीच तो तेथून बाहेर येतो. मात्र, बाल सुधार गृहात राहिल्यानंतर त्याच्यात सुधार झालेला नसतो तर तो अधिकच बिघडतो. कारण बाहेर येताच, तो प्रेयसीला मिळवण्यासाठी तिच्या संपूर्ण कुटुंबीयांनाच संपवण्याचा कट रचतो. त्यात त्याची प्रेयसीही सहभागी होते अन् स्वत:च्या हाताने जन्मदात्या आईवडिलांना, दोन भावंडांना विषाक्त पदार्थ खाऊ घालते. विषाचा दुष्परिणाम झाला नसल्याचे सांगून प्रियकराजवळ चिंताही व्यक्त करते अन् नंतर तिचा प्रियकर तिच्या वडिलांच्या छातीत धारदार शस्त्र भोसकून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करतो. नंदनवनमधील ही घटना समाजमन सुन्न करणारी आहे. या घटनेमुळेच कायद्याच्या भाषेत विधीसंघर्षग्रस्त बालके (अल्पवयीन आरोपी) किती खतरनाक बनत आहेत, त्यावर प्रकाश पडलेला आहे. वेगळे प्रकरण १६ वर्षांची मुलगी यशोधरानगर पोलीस ठाण्यात पोहचून तिच्यावर तिच्या घरी येणाऱ्या व्यक्तीने (वय ४५) पाशवी बलात्कार केल्याचे सांगते. बलात्कार करणाऱ्याला त्याच्या एका साथीदाराने मदत केल्याचाही आरोप लावते. या दोघांनी आधी हातपाय आणि तोंड घट्ट बांधले नंतर कुकर्म केल्याचे सांगते. मुख्य आरोपीचे नाव, पत्ता मुलीला माहीत असल्यामुळे पोलीस लगेच धावपळ करून त्या व्यक्तीला ठाण्यात आणतात. बदड बदड बदडतात. त्याच्या साथीदाराचे नाव पत्ता विचारला जातो. संबंधित व्यक्ती जीवाच्या आकांताने ओरडते. मी हिच्याकडे आपल्या मुलीसारखा स्रेहाने बघतो. ज्या रात्री घटना घडल्याचे ती सांगते, त्या रात्री आपण बीअरबारमध्ये नेहमीप्रमाणे कामावर होतो. तेथील सीसीटीव्ही फुटेज बघा,असेही सांगतो. पोलीस सीसीटीव्ही फुटेज बघतात. ती व्यक्ती खरी अन् स्वत:चे कपडे फाटलेल्या अवस्थेत ओल्या डोळ्यांनी ठाण्यात पोहचलेली मुलगी खोटे बोलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येते. त्यामुळे पोलीस तिला वेगळ्या पद्धतीने विचारपूस करतात. शेवटी ती बलात्कार झालाच नाही, तक्रार खोटी असल्याचे कबूल करते. आता प्रश्न उरतो, तिने असे का करावे? उत्तर तेवढेच धक्कादायक आहे. संबंधित व्यक्ती वेळी अवेळी तिच्या घरी येते. त्यामुळे मुलीला भेटायला येणाऱ्या तिच्या बॉयफ्रेण्डला अडचण होत असते. त्यामुळे ही मुलगी अन् तिचा बॉयफ्रेण्ड ‘त्या‘ व्यक्तीचे घरी येणे बंद करण्यासाठी असा खतरनाक कट रचतात. आता बोला...!(प्रतिनिधी)