शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकांमध्ये कामे अडवून तोडी करणाऱ्याची चेनच

By admin | Updated: December 19, 2015 03:02 IST

राज्यातील महापालिकांमध्ये नियमाने होणारी कामे अडवून तोडी करणाऱ्यांची चेनच असल्याचा हल्लाबोल स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला.

सगळ्या गँगचं कंबरडं मोडणार : मुख्यमंत्र्यांची ग्वाहीनागपूर : राज्यातील महापालिकांमध्ये नियमाने होणारी कामे अडवून तोडी करणाऱ्यांची चेनच असल्याचा हल्लाबोल स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला.अशा सगळ्या गँगचे कंबरडे मोडू, अशी ग्वाही त्यांनी दिली. ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांनी केलेली आत्महत्या सध्या गाजत आहे. या संदर्भात अनिल गोटे आणि अन्य सदस्यांनी आज लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, महापालिकांमध्ये विविध प्रकारच्या परवानग्या देताना प्रक्रिया आॅनलाईन करणे, तिचे सुलभीकरण करणे आणि तिच्यातील मानवी हस्तक्षेप कमीतकमी करणारी ई-प्लॅटफॉर्म पद्धत लवकरच अमलात आणली जाईल. मुंबई महापालिकेने तयार केलेल्या अशा पद्धतीचा प्रारंभ आपल्या व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ठाणे शहरात गोल्डन गँगबरोबरच सिल्व्हर गँगही आहे तिचा बंदोबस्त करा, अशी मागणी शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्याचा धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले की केवळ ठाण्यातच नव्हे तर इतरत्र असलेल्या गोल्डन, सिल्व्हरच नव्हते तर कॉपर, स्टील अशा सगळ्याच गँगचा बंदोबस्त केला जाईल.ही कीड कायमची संपविण्यासाठी आपल्याला विरोधी पक्षांचेही सहकार्य हवे आहे. महापालिकेतील परवानग्यांची फाईल नेमकी कुठे अडली, कुणामुळे आणि कशामुळे अडली यावर लक्ष ठेवणारी पारदर्शी पद्धत आणली जाईल, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)