शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

धर्मादाय आयुक्तांनी तत्कालीन अध्यक्षाचा अहवाल फेटाळला

By admin | Updated: May 15, 2016 02:43 IST

संजीवनी नवजीवन विकास शिक्षण प्रसारक संस्थेला स्वत:च्या ताब्यात ठेवण्यासाठी बनवाबनवी करून तत्कालीन अध्यक्षाने मंजूर करून घेतलेला बदल अहवाल सहायक धर्मादाय आयुक्तांनी फेटाळून लावला.

नागपूर : संजीवनी नवजीवन विकास शिक्षण प्रसारक संस्थेला स्वत:च्या ताब्यात ठेवण्यासाठी बनवाबनवी करून तत्कालीन अध्यक्षाने मंजूर करून घेतलेला बदल अहवाल सहायक धर्मादाय आयुक्तांनी फेटाळून लावला. बबनराव पुसदेकर, असे या तत्कालीन अध्यक्षाचे नाव आहे. ही शिक्षण संस्था १९७८ मध्ये स्थापन झाली. दर पाच वर्षांनी संस्थेची निवडणूक होते. २०१२ पर्यंत पुसदेकर यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी होती. त्यांच्या अध्यक्षपदाला इतर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य कंटाळलेले होते. त्यांना अध्यक्षपदावरून पदच्युत करण्याच्या हालचाली सुरू असतानाच उलट त्यांनीच संस्थेची आमसभा व निवडणूक झाल्याचे कागदोपत्री दाखविले, सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केल्या. स्वत:ला अध्यक्षस्थानी कायम ठेवले. सचिव मधुकर निकम यांच्या ऐवजी देवेंद्र मुडे यांना केले. इतर पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांमध्ये स्वत:च्या मर्जीने बदल केला. हा बदल अहवाल मूळ पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून मंजुरीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला. हा अहवाल २९ आॅक्टोबर २०१२ रोजी सहायक धर्मादाय आयुक्ताने मंजूर केला होता. यासाठी कुठलीही सुनावणी न घेता अहवाल एकतर्फी मंजूर करण्यात आला होता. या अहवालाबाबत कळताच मंजुरीच्याच दिवशी पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला होता. २ नोव्हेंबर २०११ रोजी पुसदेकर यांच्या बदल अर्जातील नऊ जणांपैकी सात सदस्यांनी अपील केले होते. बनवाबनवी केल्यावरून पुसदेकर आणि मुडेविरुद्ध नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. दरम्यान धर्मादाय आयुक्ताच्या न्यायालयात ३ एप्रिल २०१४ रोजी अपिलावर सुनावणी होऊन २९ आॅक्टोबर २०१२ चा तत्कालीन सहायक धर्मादाय आयुक्तांचा आदेश खारीज करून बदल अर्ज पुनर्चौकशीसाठी सहायक धर्मादाय आयुक्ताच्या न्यायालयात पाठविण्यात आला होता. या बदल अर्जावर सहायक धर्मादाय आयुक्त मंगला कांबळे यांच्या न्यायालयात पुनर्सुनावणी व चौकशी प्रारंभ झाली. १४ आॅगस्ट २०१४ रोजी अंतिम सुनावणी निश्चित झाली असताना पुसदेकर यांनी आक्षेपकर्त्यांच्या सह्या हस्ताक्षर तज्ज्ञाकडून तपासण्यासाठी अर्ज केला. तो फेटाळण्यात आला. याविरुद्ध पुसदेकर यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी ही याचिका खारीज केली. त्यामुळे पुन्हा जुना बदल अर्ज अंतिम सुनावणीसाठी लागला. तो १ एप्रिल २०१६ रोजी सहायक धर्मादाय आयुक्ताने खारीज केला. सध्या संस्थेचे अध्यक्ष भाऊराव खारकर, सचिव मधुकर निकम, उपाध्यक्ष दिवाकर कुरटकर, सहसचिव हनुमंत ताडपेल्लीवार आणि कोषाध्यक्ष जनार्दन चिकनकर हे आहेत. न्यायालयात संस्थेच्या वतीने अ‍ॅड. अमोल भिसे तर पुसदेकर यांच्या वतीने अ‍ॅड. महेश दांडेकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)