शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

आॅडिशनच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांचे ‘चांगभलं’

By admin | Updated: July 16, 2014 01:14 IST

आपण एखाद्या कलेत पारंगत आहोत, हे दाखविले की इतरांची आपल्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. त्यात कलेचे काहीही ज्ञान नसलेल्या तथाकथित कलावंतांना स्वनामधन्य झाल्याचे समाधान मिळते.

नागपुरात फसत आहेत नवोदित कलावंत नागपूर : आपण एखाद्या कलेत पारंगत आहोत, हे दाखविले की इतरांची आपल्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. त्यात कलेचे काहीही ज्ञान नसलेल्या तथाकथित कलावंतांना स्वनामधन्य झाल्याचे समाधान मिळते. थोडे बऱ्यापैकी गाणे म्हणता आले वा एखाद्या नाटकात छोटीशी भूमिका केली की काही लोक स्वत:ला कलावंतही समजतात. येथून स्वप्नरंजनाची दुनिया सुरू होते आणि आपण कुणीतरी ग्रेट कलावंत असण्याच्या नादात थेट चित्रपटात भूमिका करण्याचे स्वप्न पाहिले जाते. पण कुठलीही कला साधनेशिवाय प्राप्त होत नाही, याचे भान नवोदितांना राहात नाही. अशा कलावंतांच्या स्वप्नांना आकार देण्याचे आमिष देऊन उपराजधानीत गोरखधंदा सुरू आहे. आॅडिशनच्या नावावर या प्रकारात अनेकांना आर्थिकदृष्ट्या फसविण्यात आले आहे. आपण मुंबईच्या एखाद्या प्रॉडक्शन हाऊसचे युनिट आहोत आणि नव्या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहोत, असा कांगावा करून काही लोक नागपुरात येतात. एखाद्या मंगल कार्यालयात किंवा बऱ्यापैकी हॉलमध्ये आॅडिशन आयोजित केली जाते. कलावंतांना दूरध्वनी केले जातात आणि त्यानंतर आॅडिशनला प्रारंभ होतो. प्रत्येकाकडून २०० ते ५०० रुपये आॅडिशनसाठी वसूल केले जातात. चित्रपटात काम मिळण्याच्या आशेने अनेक महाविद्यालयीन युवक-युवती या आॅडिशनला जातात. त्यातील खरेखोटेपणा तपासला जात नाही. प्रत्येकाकडून किमान २०० ते ५०० रुपये घेतले जात असल्याने बक्कळ पैसा जमा होतो. यातील काही निवडून त्यांना मुंबईला ट्रेनिंगसाठी बोलाविणार असल्याचे सांगितले जाते; पण प्रत्यक्षात नंतर कधीच तसा कॉल येत नाही. तोपर्यंत काही मंडळी आपण चित्रपटातील भूमिकेसाठी निवडले गेल्याच्या आनंदात साऱ्यांनाच सांगत सुटतात; पण नंतर हसे होते. उपराजधानीत गेल्या वर्षभरात या पद्धतीने अनेक लोक फसविले गेले आहेत. आॅडिशन घेणारे लोक कोण, त्यांचे कुठले प्रॉडक्शन हाऊस आहे, त्याची सत्यासत्यता आणि चित्रपटाचे नाव आदींची काहीही माहिती करून न घेता अनेक युवक चित्रपटात काम करण्यासाठी या मोहाला बळी पडले आहेत. असे लोक वृत्तपत्रात आॅडिशनची जाहिरात देत नाहीत. एखाद्या कॉलेजमध्ये पोस्टर लावले की चित्रपटात काम करण्यासाठी इच्छुक युवकांची गर्दी ‘माऊथ पब्लिसिटीने’ होते. या प्रकाराला काही खरे रंगकर्मीही बळी पडले. पण त्याचे खरे रूप कळल्यावर नाटकांत काम करणारे कलावंत यापासून दूर झाले. त्यामुळे नाटकाची माहिती नसणारे पण चित्रपटांच्या ग्लॅमरच्या मोहात पडलेले युवक या प्रकाराचे शिकार आहेत. याबद्दल जागरूकता निर्माण होत असली तरी आॅडिशन घेणाऱ्यांची सत्यासत्यता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)