शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागात बदल्यांचा ‘गोलमाल’!

By admin | Updated: August 4, 2015 03:15 IST

वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोलमाल झाल्याचा सर्रास आरोप केला जात आहे. सध्या

नागपूर : वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोलमाल झाल्याचा सर्रास आरोप केला जात आहे. सध्या यावरू न सर्वत्र रान पेटले आहे. राज्य सरकारने स्वच्छ प्रशासनाच्या नावाखाली राज्यात बदली धोरण जाहीर केले आहे. परंतु या प्रकरणात राज्य सरकारने स्वत:चेच बदली धोरण धाब्यावर बसवून वन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे दिसून येत आहे. यात मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर फार मोठा अन्याय झाला आहे. नागपूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) शैलेश टेंभूर्णीकर यांना तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची तडकाफडकी बदली करू न, त्यांना वनभवन येथे मुख्य वनसंरक्षक (संयुक्त वनव्यवस्थापन, नियोजन व विकास) या पदावर पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सध्या वन विभागात एकूण ११ मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) अधिकारी असून, त्यामध्ये टेंभूर्णीकर हे एकमेव मागासवर्गीय अधिकारी आहेत. शिवाय ३ डिसेंबर १९८० च्या अध्यादेशानुसार मागासवर्गीय अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या ठिकाणी पदस्थापना देण्याचे निर्देश आहेत. परंतु असे असताना टेंभूर्णीकर यांना तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली करू न त्या अध्यादेशाचे खुलेआम उल्लंघन केले असल्याचा आरोप कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केला आहे. ते म्हणाले, टेंभूर्णीकर यांच्या जागी आलेले गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) टी.एस.के. रेड्डी यांच्याविरुद्ध विधानसभेत कारवाईची घोषणा करण्यात आली आहे. मात्र तरीही त्यांना बक्षीसरू पात नागपूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) म्हणून पाठविण्यात आले आहे. यापेक्षा वनमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या चंद्रपूर येथे त्यांना बसविले असते तर उत्तम झाले असते. यासंबंधी आपण मुख्यमंत्री व वनमंत्र्यांची भेट घेऊन या बदल्यांमध्ये मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर अन्याय झाला असल्याचे निदर्शनास आणून दिले असल्याचे ते म्हणाले. सीसीएफ टेंभूर्णीकर यांनी मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात अनेक चांगली कामे केली आहेत. मात्र त्यासाठी त्यांची पाठ थोपटण्याऐवजी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या या बदलीवरू न मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.