शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

महिलांप्रति सामाजिक मानसिकतेत बदल हवा

By admin | Updated: February 10, 2015 00:47 IST

महिलांवर अत्याचार होऊ नयेत याकरिता अनेक कायदे आहेत. परंतु तरीदेखील महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. केवळ कायदे बनवून महिला सुरक्षित होत नाहीत, तर त्यांच्याप्रती सामाजिक

न्या. भूषण गवई : ‘जस्टा कॉझा’ विधी महोत्सवाचा समारोपनागपूर : महिलांवर अत्याचार होऊ नयेत याकरिता अनेक कायदे आहेत. परंतु तरीदेखील महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. केवळ कायदे बनवून महिला सुरक्षित होत नाहीत, तर त्यांच्याप्रती सामाजिक मानसिकतेदेखील सकारात्मक बदल होणे आवश्यक आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी कॉलेजतर्फे आयोजित १३ व्या ‘जस्टा कॉझा’ या विधी महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, ‘बीसीयूडी’ (बोर्ड आॅफ कॉलेज अ‍ॅन्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेन्ट) संचालक डॉ.श्रीकांत कोमावार, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.प्रविणा खोब्रागडे हे उपस्थित होते. बालविवाह आणि सतीप्रथा यासारख्या चालीरीती बंद झाल्या असूनदेखील महिलांवर अद्यापही अत्याचार होत आहेत. आजही महिलांना दुय्यम स्थान देण्यात येते. महिलांना न्याय देण्यासाठी काही कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. महिला सुरक्षेप्रती वकिलांची भूमिका महत्त्वाची आहे. वकिली व्यवसायात पैसा कमावणे हे प्राथमिक ध्येय असले तरीही समाजाप्रती आपले दायित्व पार पाडतानाच महिला सुरक्षेकरिता त्यांनी योगदान द्यायलाच हवे असे आवाहन न्या.भूषण गवई यांनी केले.‘जस्टा कॉझा’मध्ये तीन दिवसांत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. ‘मूट कोर्ट’ स्पर्धेत ख्रिस्त विधी कॉलेज बेंगळुरू तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत मुंबईच्या प्रवीण गांधी विधी कॉलेजला प्रथम पारितोषिक देण्यात आले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सोनिया कुंदनानी, दर्शन शहा, साहिल श्याम देवानी, मेधानी आर्या यांनी बाजी मारली. (प्रतिनिधी)