नागपुरात ढगाळ वातावरणामुळे पुन्हा पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 22:52 IST2020-01-07T22:51:33+5:302020-01-07T22:52:58+5:30
मागील तीन दिवसात पावसाने विश्रांती घेतल्यावर पुन्हा आगमनाची तयार चालविल्याचे दिसत आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे क्वचितच सूर्यदर्शन झाले. याच काळात आकाशात ढगाळ वातारवण असल्याने बुधवारी किंवा गुरुवारी पाऊस येऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

नागपुरात ढगाळ वातावरणामुळे पुन्हा पावसाची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील तीन दिवसात पावसाने विश्रांती घेतल्यावर पुन्हा आगमनाची तयार चालविल्याचे दिसत आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे क्वचितच सूर्यदर्शन झाले. याच काळात आकाशात ढगाळ वातारवण असल्याने बुधवारी किंवा गुरुवारी पाऊस येऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार, पुढील काळात आकाश ढगाच्छादित राहील. त्यामुळे एक किंवा दोन दिवसात पाऊस येऊ शकतो. अफगाणिस्तान व लगतच्या क्षेत्रातील हवामानातील बदलामुळे मध्य भारतामधील आकाशात ढग दाटले आहेत. राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आदी क्षेत्रामध्ये चक्रियवात निर्माण झाल्याने त्याचा परिणाम मध्य प्रदेश, विदर्भ व परिसरातील क्षेत्रावर पडू शकतो. विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची दाट शक्यता आहे.
याचदरम्यान मंगळवारी ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान २४ तासात ३.६ अंश सेल्सिअसवरून ११.५ अंशावर पोहचले. विदर्भात १०.५ अंश तापमानाची सर्वात कमी नोंद गोंदियात झाली. मागील २४ तासात विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये २ ते ३ अंशाने तापमान वाढल्याची नोंद झाली आहे.
नागपुरातील कमाल तापमानसुद्धा ०.४ वरून २६.७ अंश सेल्सिअसवर पोहचले. तरीही सामान्य तापमानापेक्षा २ अंशाने कमी असल्याने वातावरणात दिवसभर चांगलाच गारवा जाणवत होता. याशिवाय ब्रह्मपुरीमध्ये १२ अंश, वाशिममध्ये १३ अंश किमान तापमान होते. बुलडाणा व यवतमाळात विदर्भात सर्वाधिक म्हणजे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस होते.