शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

चाैघांना भिलाई येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : विशाल चरण धुर्वे, रा. चित्तरंजन नगर, झोपडपट्टी, कामठी याला काहींनी शनिवारी (दि. १७) रात्री ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : विशाल चरण धुर्वे, रा. चित्तरंजन नगर, झोपडपट्टी, कामठी याला काहींनी शनिवारी (दि. १७) रात्री मारहाण केल्याने ताे गंभीर जखमी झाला हाेता. त्याचा शनिवारी (दि. २४) सकाळी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्याच्या खूनप्रकरणात कामठी (नवीन) पाेलिसांनी चार आराेपींना भिलाई (छत्तीसगड) येथून रविवारी अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये गगन नागराज थूल (२६), अक्षय ऊर्फ दादू राजू गडकरी (२२), शिवम प्रकाश उके (२१) व शेख जाकीर शेख साबिर (२२) सर्व रा. चित्तरंजन नगर, झोपडपट्टी, कामठी यांचा समावेश आहे. यातील तिघांनी अवैध धंद्यातील भांडणातून विशालला जबर मारहाण केली हाेती. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले हाेते. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणात खुनाचा गुन्हा नाेंदवून आराेपीस अटक करण्यात यावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी ठाणेदार विजय मालचे यांच्याकडे केली हाेती. त्यांनी आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी खुनाचा गुन्हा नाेंदविण्याची मागणी रेटून धरत विशालचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला हाेता. त्यामुळे पेच निर्माण झाला हाेता. तत्पूर्वी पाेलिसांनी आराेपींच्या शाेधात पथकही रवाना केले हाेते. पाेलिसांनी चारही आराेपीस भिलाई येथे अटक करून कामठीला आणले.

याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३०२, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. ही कामगिरी दुय्यम पोलीस निरीक्षक मंगेश काळे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, हेड कॉन्स्टेबल पप्पू यादव, मंगेश लांजेवार, मनोहर राऊत, प्रमोद वाघ, ललित शेंडे, नीलेश यादव, सुरेंद्र शेंडे, संदीप गुप्ता, उपेंद्र यादव, राजा टाकळीकर, सुधीर कनोजिया, अनिल बाळराजे यांच्या पथकाने केली.