शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळ दिल्लीला पळविण्याचा डाव

By admin | Updated: November 17, 2015 04:14 IST

उपराजधानीला एज्युकेशनल हब म्हणून विकसित करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. सरकारच्या

नागपूर : उपराजधानीला एज्युकेशनल हब म्हणून विकसित करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. सरकारच्या प्रयत्नामुळे एम्स, आयआयएम, ट्रिपल-आयटीसारख्या संस्था नागपुरात सुरु होणार आहेत. इकडे मात्र केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे नागपुरात असलेले मुख्यालय दिल्लीला पळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात होणाऱ्या व्यवस्थापन मंडळाच्या (गव्हर्निंग बॉडी) बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार होईल, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.देशभरातील श्रमिक, कामगारांना कामाचे स्वरूप, कायदे आणि त्यांच्या अधिकाराबाबत शिक्षित करण्याचे श्रमिक शिक्षण मंडळाद्वारे केले जाते. यासाठी अभ्यासक्रमही तयार केला जातो. श्रमिक शिक्षण मंडळाचे देशभरात सध्या ५० विभागीय व ९ उपविभागीय केंद्रे आहेत. यातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ वर्कर्स एज्युकेशनचे रिजनल सेंटर मुंबईला आहे. या सर्व केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय १९५८ साली नागपुरात स्थापन करण्यात आले. नागपूर हे देशाच्या मध्यस्थानी असल्याने देशभरातील विभागीय केंद्रांवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल, या हेतूने त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी मुख्यालय नागपूरला स्थापन करण्याचा विचार केला होता. मात्र यावेळच्या लोकांना नागपूरचे केंद्रस्थान आणि महत्त्व वाढणे मान्य नसावे म्हणून की काय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला पळविण्याचा डाव रचला जात आहे. सिलॅबस रिव्हीव्ह कमिटीचा घोळश्रमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम अभ्यासक्रम पुनरावलोकन समितीकडे (सिलॅबस रिव्हीव्ह कमिटी) असते. या समितीला केवळ पाठ्यक्रमाबाबत शिफारशी देण्याचा अधिकार आहे. मात्र याच समितीने हा नवीन घोळ घातल्याचे समजते. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, या समितीला पाठ्यक्रमाचे पुनरावलोकन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र समितीने पाठ्यक्रमासोबत हे मुख्यालयच दिल्लीला हलविण्याचा प्रस्ताव तयार केला. येथे योग्य व्यवस्था नाहीत, काम करण्याला अडचणी येतात आणि सर्व मुख्यालय दिल्लीला असताना हेच मुख्यालय नागपुरात का असावे, असा तर्क देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. समितीने हा प्रस्ताव श्रम मंत्रालयाकडे सादर केला आहे. आता १८ नोव्हेंबरला होणाऱ्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.