शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही फुटेज विश्वासार्ह नाही

By admin | Updated: April 29, 2016 03:02 IST

युग चांडक हत्याकांड प्रकरणात सादर करण्यात आलेले सीसीटीव्ही फूटेज विश्वासार्ह नाही, असा दावा आरोपी राजेश धनालाल दवारेचे वकील मीर नगमान अली यांनी ..

आरोपीच्या वकिलाचा दावा : युग चांडक हत्याकांड प्रकरणनागपूर : युग चांडक हत्याकांड प्रकरणात सादर करण्यात आलेले सीसीटीव्ही फूटेज विश्वासार्ह नाही, असा दावा आरोपी राजेश धनालाल दवारेचे वकील मीर नगमान अली यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केला.या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी होत आहे. आरोपीची ओळखपरेड संशयास्पद आहे. ओळखपरेड घेताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले नाही. युगला अपहरण करताना पाहणारे अरुण मेश्राम, बिहारीलाल छाबडिया व राजन तिवारी हे तीन साक्षीदार जाणीवपूर्वक तयार करण्यात आले आहेत. अपहरणकर्ते चेहऱ्याला रुमाल बांधून होते. यामुळे त्यांना ओळखणे कठीण होते. अपहरणाच्या वेळेमध्ये तफावत आहे असेही अली यांनी न्यायालयाला सांगितले. ते उर्वरित युक्तिवाद उद्या, शुक्रवारी करतील.अरविंद अभिलाष सिंग (२४) हा प्रकरणातील दुसरा आरोपी आहे. सत्र न्यायालयाने ४ फेब्रुवारी २०१६ रोजी दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३६४ -अ (खंडणीसाठी अपहरण)अंतर्गत मरेपर्यंत फाशी, कलम ३०२ (हत्या)अंतर्गत मरेपर्यंत फाशी व कलम २०१ (पुरावे नष्ट करणे)अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी हे प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ३६६ अनुसार उच्च न्यायालयात सादर करण्यात आले आहे. तसेच दोन्ही आरोपींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले आहे. ही घटना १ सप्टेंबर २०१४ रोजी घडली होती. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे, तर फिर्यादीतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)