देशी, माेहफुलांची दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:08 IST2021-05-16T04:08:40+5:302021-05-16T04:08:40+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वानाडाेंगरी : हिंगणा पाेलिसांच्या पथकाने माेंढा येथे कारवाई करीत देशी व माेहफुलांची दारू पकडली. यात अवैध ...

Caught a native, honeydew liquor | देशी, माेहफुलांची दारू पकडली

देशी, माेहफुलांची दारू पकडली

लाेकमत न्यूज नेटवर्क

वानाडाेंगरी : हिंगणा पाेलिसांच्या पथकाने माेंढा येथे कारवाई करीत देशी व माेहफुलांची दारू पकडली. यात अवैध दारू विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून एकूण ३,४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १३) दुपारी २ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

आशिष गायकवाड, (रा. माेंढा, ता. हिंगणा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. आशिष अवैधरीत्या दारू विक्री करीत असल्याची माहिती हिंगणा पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार पाेलीस पथकाने धाड टाकून त्याच्या घराची झडती घेतली. त्यात पाेलिसांना त्याच्या घरात देशी दारूच्या २० बाटल्या आणि सहा लिटर माेहफुलांची दारू आढळून आली. दारूची अवैध विक्री करीत असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला/ त्याच्याकडून ३,४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस कर्मचारी रितेश मांगूळकर, प्रवीण फाळके, स्वप्निल करांडे यांच्या पथकाने केली.

Web Title: Caught a native, honeydew liquor