शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गुरांच्या वाहतुकीचे वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:13 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क केळवद : पाेलिसांच्या पथकाने नागपूर-छिंदवाडा (मध्य प्रदेश) महामार्गावरील खुर्सापार शिवारातील आरटीओ चेक पाेस्टजवळ केलेल्या कारवाईमध्ये गुरांची ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

केळवद : पाेलिसांच्या पथकाने नागपूर-छिंदवाडा (मध्य प्रदेश) महामार्गावरील खुर्सापार शिवारातील आरटीओ चेक पाेस्टजवळ केलेल्या कारवाईमध्ये गुरांची विना परवानगी वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण २६ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. १२) रात्री करण्यात आली.

केळवद पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना वाहन निरीक्षक अर्चना घाणेगावकर यांनी गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती दिली. त्यामुळे या पथकाने तातडीने खुर्सापार चेक पाेस्ट गाठून आरजे-२९/जीए-८०६५ क्रमांकाच्या कंटेनरची झडती घेतली. त्यांना त्या कंटेनरमध्ये एकूण ४३ जनावरे काेंबली असल्याचे तसेच त्यातील दाेन गुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे आढळून आले.

ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी शहाबुद्दीन जनक खान (३९), अजिम सद्दीक खान (३२) दाेघेही दाेहा, जिल्हा मेवात, हरियाणा, दानिश युसूफ खान (२४), दानिश अय्युब खान (२४), आसीफ एहसान कुरेशी (२२), तिघेही रा. बागपत, उत्तर प्रदेश व असरू सुभान खान, रा. मंडीखेडा, जिल्हा मेवात, हरयाणा यांच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला.

या कारवाईमध्ये कंटेनर व जनावरे असा एकूण २६ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मृत गुरांची विल्हेवाट लावण्यात आली असून, उर्वरित गुरांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये ठेवण्यात आले, अशी माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी ठाणेदार दिलीप ठाकूर, सहायक फाैजदार अमरदीप कामठे, रवींद्र चटप, सचिन येळेकर, श्रीधर कुळकर्णी, धाेंडूतात्या देवकाते, गुणवंता डाखाेळे यांच्या पथकाने केली.