घराला कुलुप लाऊन बाहेर गेले, आरोपीने रोख, दागिने पळविले

By दयानंद पाईकराव | Published: June 26, 2023 02:03 PM2023-06-26T14:03:59+5:302023-06-26T14:05:11+5:30

गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु

cash, jewellery worth 1.5 lakh stolen from the closed house in nagpur | घराला कुलुप लाऊन बाहेर गेले, आरोपीने रोख, दागिने पळविले

घराला कुलुप लाऊन बाहेर गेले, आरोपीने रोख, दागिने पळविले

googlenewsNext

नागपूर : घराला कुलुप लाऊन पत्नीसह बाहेर गेलेल्या व्यक्तीच्या घरातील रोख आणि सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने पळविला. ही घटना शनिवारी २४ जूनला सायंकाळी सहा ते २५ जूनला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

निखिल मुकेश ऐरकुडे (वय ३३, रा. हनुमाननगर, नंदनवन) हे आपल्या घराला कुलुप लाऊन पत्नीसह बाहेर गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील लोखंडी कपाट व देवघरातील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख १५०० रुपये असा एकुण १ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. निखील यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Web Title: cash, jewellery worth 1.5 lakh stolen from the closed house in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.