शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या विद्यापीठाला कानपिचक्या

By admin | Updated: February 21, 2015 14:49 IST

१0१ वा दीक्षांत समारंभ : निकाल वेळेत व अचूक लागावे, 'सोशल मीडिया'चा उपयोग व्हावा

■ येथे येण्याअगोदर मी विद्यापीठाचे 'सोशल मीडिया'वर कुठले 'अकाऊंट' आहे का याचा शोध घेतला. एक 'अकाऊंट' सापडले, पण त्यात २0११ पासून कुठलीही हालचाल झालेली नाही. 'सोशल मीडिया' हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक, त्यातील बदल, सूचना इत्यादी बाबी या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. त्यामुळे 'सोशल मीडिया'चा वापर करण्याबाबत विद्यापीठाने विचार करावा, असेदेखील ते म्हणाले.नागपूर विद्यापीठाला मिळावा केंद्रीय दर्जा■ राज्यात एकही केंद्रीय विद्यापीठ नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आह. जर तसा पुढाकार घेण्यात आला तर शासनाकडून त्याला पूर्ण सहकार्य मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूर : साधारणत: एखाद्या विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ म्हटला की त्याबद्दल प्रमुख अतिथींकडून गोडवे गायले जातात. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचेच माजी विद्यार्थी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाच्या ढिसाळ कार्यपद्धतीबद्दल १0१ व्या दीक्षांत समारंभादरम्यान प्रशासनाला कानपिचक्या दिल्या. परीक्षांचे निकाल वेळेवर व अचूकपणे लागावेत ही विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. प्रशासकीय चौकटीतून बाहेर येऊन जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, असा सल्लादेखील त्यांनी दिला.डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या १0१ व्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची पूर्ण वेळ उपस्थिती होती. याच विद्यापीठात शिक्षण झाले असल्याने व लोकप्रतिनिधी म्हणून येथील समस्यांची जाण असल्याने मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाच्या त्रुटींवर बरोबर बोट ठेवले. विद्यापीठात सर्वात मोठी समस्या आहे ती मूल्यांकनासंदर्भात. वेळेत मूल्यांकन न होणे, चुकीच्या पद्धतीचे मूल्यांकन तसेच फेरमूल्यांकनाच्या निकालांना होणार उशीर यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे यात लवकरात लवकर बदल करणे आवश्यक आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा व या सर्व बाबी 'ई-प्लॅटफॉर्म'वर यायला हव्यात, असे मुख्यमंत्री म्हणाले. विद्यापीठात अनेक अभ्यासक्रम आजच्या तारखेत सुरू आहेत. यातील किती अभ्यासक्रम खरोखरच कामाचे आहेत याची विद्यापीठाने तपासणी करायला हवी. अभ्यासक्रमांच्या वास्तविकतेचे मूल्यमापन करणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.