शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कॅमेरून नागरिकाला कारावास

By admin | Updated: August 17, 2016 02:12 IST

भारतात मुदतबाह्य वास्तव्य केल्याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी डी. पी. रागीट यांच्या न्यायालयाने दोन विदेशी

लॉटरी बक्षिसाच्या नावे फसवल्याचे प्रकरण : मुदतबाह्य वास्तव्यासाठी शिक्षा, भारतातून हद्दपारीचा आदेश नागपूर : भारतात मुदतबाह्य वास्तव्य केल्याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी डी. पी. रागीट यांच्या न्यायालयाने दोन विदेशी नागरिकांपैकी एकाला एक वर्ष सश्रम कारावास आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षेची मुदत संपल्यानंतर या आरोपीला भारत देशातून हद्दपार करण्यात यावे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. अन्य दुसऱ्या आरोपीची पुरावे सिद्ध न झाल्याने निर्दोष सुटका केली. एरिक डेव्हिड टेन्डो, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून तो कॅमेरून देशाच्या डौऊला येथील रहिवासी आहे. याकुबा अली ट्रावरे, असे निर्दोष सुटलेल्या आरोपीचे नाव असून तो माली देशाच्या बामाको येथील रहिवासी आहे. एरिकला विदेशी नागरिक अधिनियम १९४६ च्या कलम १४ (ए)(बी)(सी) अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम १९२० कलम ३ (२)(ए), पारपत्र (भारतात प्रवेश) नियमावली १९५० च्या नियम ६ (ए) अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. आरोपीची शिक्षेची मुदत संपल्यानंतर त्याला भारत देशातून हद्दपार करण्यात यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. आरोपींना पकडले होते रंगेहाथ नागपूर : टिळकनगर येथील रहिवासी प्रकाश भय्याजी बडगे यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी १३ सप्टेंबर २०१५ रोजी भादंविच्या ४२०, ४६५, ३४, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६ (डी), विदेशी नागरिक अधिनियम १९४६ च्या कलम १४ (ए) (बी)(सी), पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम १९२० च्या कलम ३(२)(ए) आणि पारपत्र (भारतात प्रवेश) नियमावली १९५० च्या नियम ६ (ए) अन्वये गुन्हे दाखल करून याकुबा आणि एरिक या दोघांना अटक केली होती. या गुन्ह्यातील सुमीत कपूर, मार्क फिलीप्स, कवलदीप हरविंदर सिंग रा. गुडगाव आणि दोन महिला के. के. फेलिक्स आणि थांगनेनम माटे रा. मणिपूर, असे पाच आरोपी पोलिसांना अखेरपर्यंत गवसलेच नाहीत. पोलीस निरीक्षक एस.एम. गोराडे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. प्रकरण असे की, आरोपी याकुबा हा बनावट व्हिसाच्या आधारे बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करताना आढळून आला होता. तो ३१ डिसेंबर २०१४ रोजी ट्युरिट व्हिसावर आला होता. तो ३० डिसेंबर २०१५ पर्यंत वैध होता. हा व्हिसा तीन महिने मुदतीचा असतो, मुदतवाढ मिळत नाही. आरोपी एरिक हा दुसऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट स्वत:चा म्हणून वापरत होता. त्याच्याजवळील बिझिनेस व्हिसाही बनावट होता. त्याने ३० एप्रिल २०१४ रोजी भारतात प्रवेश घेतला होता. त्याची मुदत २८ जून २०१४ रोजीच संपली होती आणि तो कुलू या नावाने वावरत होता. या दोन्ही आरोपींनी प्रकाश बडगे यांना शेवरलेट मोटार कंपनीचे खोटे ई-मेल पाठवून एक लाख अमेरिकन डॉलरचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवले होते. आरोपी आणि साथीदारांनी त्यांच्याकडून ९० हजार ५०० रुपये प्राप्त केले होते. या दोन आरोपींनी गोदरेजच्या लॉकरभर काळ्या कागदाचे बंडल्स अमेरिकन डॉलर आहेत, असे सांगून आणले होते. पुन्हा त्यांनी ५६ हजाराची मागणी केली होती. बडगे यांच्या सूचनेवरून या दोघांना रंगेहात अटक करण्यात आली होती. न्यायालयात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्यावरून न्यायालयाने एकाला शिक्षा तर दुसऱ्याची निर्दोष सुटका केली. न्यायालयात सरकारच्या वतीने वरिष्ठ सरकारी वकील ए. पी. सिंग तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. पी. पी. कोतवाल, अ‍ॅड. शेख सबाह यांनी काम पाहिले. नायक पोलीस शिपाई नितीन तिवारी यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)