शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सुपारीचा अवैध व्यवसाय होतोय

By admin | Updated: November 18, 2016 03:02 IST

नागपुरात सुपारीचा अवैधपणे व्यवसाय केला जात असल्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपये महसुलाचे नुकसान होते,

हायकोर्टात याचिका : कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसाननागपूर : नागपुरात सुपारीचा अवैधपणे व्यवसाय केला जात असल्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपये महसुलाचे नुकसान होते, असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका जनहित याचिकेत करण्यात आला आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी गुरुवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर प्रतिवादींना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.प्रतिवादींमध्ये राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव, पोलीस आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. डॉ. मेहबूब जिमठाणवाला असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते सी. के. इन्स्टिट्यूट अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आहेत. १६ जून २०१६ रोजी इतवारी रेल्वेस्थानकावरून २३ बोगी सुपारी जप्त करण्यात आली होती. अवैधपणे नागपुरात आणलेल्या या सुपारीची किंमत ९ कोटी रुपये होती. सार्क सदस्य देशांतून सुपारी आणल्यास ८ टक्के तर, अन्य देशांतून सुपारी आणल्यास ११३ टक्के सीमा शुल्क आकारला जातो. व्यापारी ११३ टक्के सीमा शुल्क टाळण्यासाठी सार्क सदस्य देशांच्या मार्गाने सुपारी भारतात आणत आहेत.इंडोनेशियातून सुपारी खरेदी केल्यास ती आधी नेपाळ येथे उतरवली जाते. यानंतर हा व्यवहार नेपाळमध्ये झाल्याचे दाखवून सुपारी भारतात आणली जाते. परंतु, ८ टक्के सीमा शुल्काचा नियम लागू होण्यासाठी संबंधित वस्तूचे उत्पादन संबंधित देशात होणे आवश्यक आहे. यासंदर्भात चौकशी केली जाते. असे असले तरी व्यापारी गैरमार्गाचा अवलंब करून मोठ्या प्रमाणात सुपारी आयात करीत आहेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)