शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला जिवंत जाळले!

By admin | Updated: March 28, 2016 01:45 IST

आकोट येथील घटना; पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल.

आकोट (जि. अकोला): घरगुती कारणाने भांडण करून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याची घटना २६ मार्च रोजी स्थानिक चिरफाड बंगल्याजवळ घडली. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून, पतीविरुद्ध आकोट शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अंजनगाव मार्गावरील चिरफाड बंगल्याजवळ रेखाते कुटुंब राहते. या कुटुंबात पती देवीदास महादेव रेखाते हा पत्नी इंदू रेखाते (३५) हिच्यासोबत घरगुती कारणावरून नेहमीच कटकट करायचा. घटनेच्या दिवशीसुद्धा इंदूसोबत भांडण करून तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. जखमी अवस्थेत उपचाराकरिता दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. तत्पूर्वी इंदू रेखाते हिची मृत्यूपूर्व जबानी नोंदविण्यात आली. त्यावरून इंदू रेखातेतर्फे फिर्यादी होमगार्ड प्रवीण नाथे याने मृत्यूपूर्व जबानीचा आशय घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून व र्मग खबरीवरून आरोपी पती देवीदास महादेव रेखाते याच्या विरुद्ध भादंवि ३0७, ३0२ कलमान्वये आकोट शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अण्णाराव खोडेवाड करीत आहेत.