शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
4
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
6
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
7
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
8
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
9
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
10
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
11
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
12
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
13
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
14
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
15
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
16
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
17
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
18
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
19
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
20
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
Daily Top 2Weekly Top 5

१२७ ग्रा.पं.साठी बंपर मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST

- ३०१५ उमेदवार रिंगणात, ४८५ केंद्रावर मतदान - महाविकास आघाडी-भाजपसमर्थीत पॅनलमध्ये टक्कर नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी ...

- ३०१५ उमेदवार रिंगणात, ४८५ केंद्रावर मतदान

- महाविकास आघाडी-भाजपसमर्थीत पॅनलमध्ये टक्कर

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी दुपारी ४.३० वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्क्यांहून अधिक ग्रामस्थांनी मतदानाचा हक्क बजाविला. कोरोनाला न घाबरता ग्रामस्थांनी गावकारभाऱ्यांची निवड करण्यासाठी सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी केली होती. मतदान केंद्रावर प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी मतदान केंद्राच्या बाहेर ग्रामस्थ आणि राजकीय गटांच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाविषयक नियमांना हरताळ फासल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात एकूण १३० नियोजित ग्रामपंचायतींपैकी सोनपूर (कळमेश्वर) व जटामखोरा (सावनेर) या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यासोबत कुही तालुक्यातील देवळी कला ग्रामपंचायतीची निवडणूक मतदार यादीतील घोळामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे १२७ ग्रामपंचायतीच्या १,०८६ जागांसाठी सकाळी ७.३० वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली. एकूण ३,०१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध भाजपसमर्थित पॅनल अशी लढत होत आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यात ४८५ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. दुपारी ३.३०पर्यंत कळमेश्वर तालुक्यात ६२.६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. यासोबतच काटोल तालुक्यात (७२.२८ टक्के), रामटेक तालुका (६३.८८ टक्के), पारशिवनी तालुका (५६ टक्के), उमरेड तालुका( ६३ टक्के) मतदारांनी मदानाचा हक्क बजाविला होता.

आजी-माजी मंत्र्यांचे स्वगावात मतदान

कोराडी (ता.कामठी) आणि पाटणसावंगी (ता.सावनेर) येथील निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पाटणसावंगी येथील मतदान केंद्रावर पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार तर कोराडी येथे भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजाविला.

ईव्हीएममध्ये दोन ठिकाणी बिघाड

ग्रामपंचायत निवडणुकीत ईव्हीएमबाबत फारश्या तक्रारी दिसून आल्या नाही. नागपूर ग्रामीण तालुक्यात धामना लिंगा येथील वॉर्ड क्रमांक १च्या मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदानाची प्रक्रिया तासाभरासाठी खोळंबली. यानंतर मशीन बदलून मतदान सुरू करण्यात आले. सावनेर तालुक्यातील पोटा (चनकापूर) ग्रा. पं. च्या मतदान केंद्र क्रमांक २६१ येथे ईव्हीएममध्ये बिघाड असल्याचा आक्षेप एका मतदाराने घेतला होता. मात्र अधिकाऱ्यांनी तपासणी केली असताना ईव्हीएममध्ये कोणताही बिघाड दिसून आला नाही.