शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे बजेट कोलमडले

By admin | Updated: August 15, 2016 01:52 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे महापालिकेला गेल्या १३ महिन्यांच्या कालावधीत ३९५ कोटींचा फटका बसला आहे.

एलबीटीमुळे ३९५ कोटींचा फटका : मागणीच्या तुलनेत कमी अनुदान नागपूर : स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे महापालिकेला गेल्या १३ महिन्यांच्या कालावधीत ३९५ कोटींचा फटका बसला आहे. यामुळे आर्थिक गणित कोलमडल्याने शहरातील विकास कामांवर परिणाम झाला आहे. १ आॅगस्ट २०१५ पासून एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेताना गेल्या पाच वर्षांत सर्वाधित जकात मिळालेल्या वर्षातील उत्पन्न गृहीत धरून महापालिकांना आर्थिक अनुदान दिले जाणार होते. त्या आधारे महापालिकेने राज्य सरकारकडे दर महिन्याला ६५ क ोटींच्या अनुदानाची मागणी केली होती. परंतु त्या तुलनेत अनुदान प्राप्त झालेले नाही. यामुळे महापालिकेपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. परंतु आॅगस्ट ते डिसेंबर २०१५ दरम्यान महापालिकेला ३०.९३ कोटींचे अनुदान मिळत होते. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये ५०.११ क ोटी त्यानंतर ४९.२९ कोटी व पुढे ४६.८१ कोटी करण्यात आले. १ आॅगस्ट २०१५ पासून एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेताना गेल्या पाच वर्षात सर्वाधित जकात मिळाललेल्या वर्षाचे उत्पन्न गृहीत धरून महापालिकांना आर्थिक अनुदान दिले जाणार होते. त्यानुसार दर महिन्याला ६५ क ोटींची मागणी केली होती. परंतु मागणीनुसार अनुदान मिळत नसल्याने महापालिका प्रशासनाने इतर आर्थिक स्रोतांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज होती. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने अपेक्षित महसूल मिळाला नाही. मालमत्ता कर, पाणीपट्टी, एलबीटी व इतर मार्गाने महापालिके ला गेल्या वर्षभरात ७९६ कोटींचा महसूल जमा झाला आहे. २०१५ - १६ या वर्षात मालमत्ता करापासून २७०.८५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना प्रत्यक्षात १८७ कोटी जमा झाले. पाणीपट्टीपासून १५० कोटी गृहीत धरले होेते. परंतु प्रत्यक्षात १२० कोटींचा आकडा पार केलेला नाही. नगररचना विभागाकडून १४५ कोटी अपेक्षित असताना ६५ कोटींचाच महसूल जमा झाला आहे.(प्रतिनिधी) विकास कामे रखडली गेल्या पाच वर्षांच्या अर्थसंकल्पात विविध योजनांची व विकास कामांची घोषणा करण्यात आली. परंतु महापालिकेच्या तिजोरीत निधीच नसल्याने ही विकास कामे रखडली आहेत. विकास कामांना निधी उपलब्ध व्हावा, यासाठी रस्ते, सिवेज लाईन व इतर कामांसाठीचा निधी वळता करण्यात आला आहे.